आरोग्य विभागातील अंशकालीन कर्मचाऱ्यांना वेतन द्या
By Admin | Published: November 5, 2016 12:49 AM2016-11-05T00:49:53+5:302016-11-05T00:49:53+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्रीपरिचर या कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा ...
ज्ञानदीप फाऊंडेशन युवा सामाजिक संघटनेची मागणी
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्रीपरिचर या कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा अशी मागणी ज्ञानदीप फाऊंडेशन युवा सामाजिक संघटनेने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष तेजपाल मोरे व उपाध्यक्ष मोरेश्वर राऊत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बागडे, कार्याध्यक्ष रविंद्र चन्ने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या एका लेखी निवेदनाद्वारे पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे केली आहे.
शासकीय कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वेतनवाढी देते पंरतु या अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मानधनात मात्र वाढ करण्यात आलेली नाही. तसेच या अंशकालीन कर्मचाऱ्यांचे पगार सुध्दा वेळेवर होत नाही. मागील ३० ते ४० वर्षापासून हे कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना फिल्डवर २४ तास रात्रीबेरात्री ड्यूटी कराव्या लागतात. पंरतु शासनाकडून या कर्मचाऱ्यांना फक्त १२०० रुपये एवढे तुटपुंजे मानधन देण्या तयेत आहे. वाढत्या महागाईच्या काळात एवढ्या तुटपूंज्या मानधनावर जीवन कसे जगावे हा गहन प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. वाढत्या महागाईत या कर्मचाऱ्यांचे जीवन जगने दुरापास्त झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.वेळीच दखल घेवून सार्वजनिक आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचर या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तात्काळ वाढ करुन या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, अशी मागणी संघटनेच्यावतीने सीईओ यांना निवेदनाद्वारे केली आहे. (नगर प्रतिनिधी)