आशा वर्करांना वेतन आयोगाचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 09:29 PM2017-10-15T21:29:50+5:302017-10-15T21:30:04+5:30
महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने जिल्ह्यातील आशा कर्मचाºयांच्या मोर्च्याचे बस स्थानकावर आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने जिल्ह्यातील आशा कर्मचाºयांच्या मोर्च्याचे बस स्थानकावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद आयोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आशा कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर व आयटकचे कार्याध्यक्ष हिवराज उके यांच्या नेतृत्वात खालील मागण्यांचे निवेदन जि.प. चे प्रशासन अधिकारी एम.डी. केवट व कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राजेश भुरे यांनी स्विकारले. स्थानिक मागण्या सोडवून इतर मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्र्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक मागण्यात रुग्णालयात आशांसाठी आशा निवास व मानव विकास कार्यक्रमाच्या कामाचा मोबदला तसेच शासनाने यवतमाळ औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१२ पासून सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना नियमित करून नियमित कामगारांचे सर्व लाभ व पगार संपूर्ण फरकासह मिळावे, ३१ मार्च रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत दरमहा १५०० रूपये मानधन देण्याच्या निर्णयाची एप्रिल महिन्यापासून अंमलबजावणी करा, तसेच आशांना व गटप्रवर्तक महिलांना सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय कामगार संघटनांच्या मागणीनुसार दरमहा १५००० रूपये किमान वेतन मिळावे, सर्व आशांना जननी सुरक्षा योजनेतील लाभासाठी दारिद्रय रेषेची अट शिथील करून सर्वांनाच लाभ द्यावे, आशांना आरोग्य खात्याकडून सन्मानाची वागणूक द्या, एपीएल व बीपीएल असा भेदभाव न करता प्रसुती होणाºया लाभार्थी महिलेस व आशेला जननी सुरक्षा योजने अंतर्गत लाभ देण्यात यावे या मागण्यांसह १८ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.