अड्याळ येथे शांतता रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:08 PM2018-01-02T23:08:05+5:302018-01-02T23:09:01+5:30
१ जानेवारी २०१७ रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीमा कोरेगाव (पुणे) मध्ये गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ....
आॅनलाईन लोकमत
अड्याळ : १ जानेवारी २०१७ रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीमा कोरेगाव (पुणे) मध्ये गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अड्याळ येथील वैशाली बौद्धविहार, मैत्रेय आणि रमाई बौद्ध विहार समितीतर्फे व ग्रामस्थांतर्फे निषेध शांतता रॅलीचे आयोजन वैशाली बहुउद्देशीय बौद्ध कार्यकारिणी समिती आंबेडकर वॉर्ड मधून सुरुवात करण्यात आली होती.
पुणे येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभास बहुजन तथा संविधानाला मानणारे अनुयायी अभिवादन करण्यास जातात. याठिकाणी मानवंदना देण्यासाठी भारतातून अनुयायी आले होते. त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून अड्याळ येथे शांततारॅलीचे काढण्यात आली. या भ्याड हल्ल्यातील आरोपींना अटक करून अॅट्रासिटीअंतर्गत आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग या गुन्ह्याअंतर्गत कार्यवाई करण्यात यावी, यासाठी वैशाली बौद्ध विहार रमाई व मैत्रेय बौद्ध विहार समिती पदाधिकाऱ्यांकडून अड्याळ पोलिसांना निवेदन देण्यात आले.
बुधवारला जिल्हा बंदचे आवाहन
भंडारा : भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभावर मानवंदना देण्याकरिता गेलेल्या भीमसैनिकांवर हल्ल्याचा निषेध व झालेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, या मागणीला घेऊन बुधवार ३ जानेवारीला विविध पक्ष व संघटनांकडून भंडारा जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या बंदला भारिप-बहुजन महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पक्षासह अन्य संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, वाहनचालक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.