शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 09:27 PM2019-04-30T21:27:29+5:302019-04-30T21:29:41+5:30

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे.

Peepate for drinking water in the city | शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

Next
ठळक मुद्देपाण्याची नासाडी चिंताजनक ठरणार : मेंढा परिसरात नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. आता सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने पाण्याची नासाडी भविष्यात चिंताजनक ठरणार आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळण्याकरीता जन प्रबोधनाची गरज आहे.
नळ आल्यानंतर घरातील पाणी भरून झाल्यानंतर अनेक जण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही दुचाकी वाहणे, चारचाकी वाहने व गोठ्यातील जनावरे रस्त्यावरून जाणून धूत असतात. पाणी भरून झाल्यानंतर नळ बंद करणे गरजेचे असताना नळ सुरू असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपयोगी पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याची नासाडी भविष्यात चिंताजनक ठरणारी आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व समजण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे.
एकीकडे गुंडभर पिण्याचे पाण्यासाठी पायपिट पहावयास मिळते. तर काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय दिसून येतो. यावर पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज आहे. अन्यथा पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
नळाला शुद्ध पाणी येण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात. नदीतील पाणी पाईप लाईनमधून आल्यानंतर शुद्धीकरण यंत्रात पाणी शुद्ध केल्या जाते. यासाठी प्रशासनाला मोठा खर्च येतो. पाणी शुद्ध झाल्यानंतर पाण्याच्या टाकीत साठवणूक करून दररोज पहाटेपासून वार्डा-वार्डात वितरीत केल्या जातो.
या सर्व कायार्साठी मोठी मेहनत व खचार्चा भार सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. परंतु या सर्व बाबींचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लिटर पाणी लागते. अशा पद्धतीने पाणी वापरले तर पाणी पूररणार कसे, नळाचे पाणी जाई पर्यंत अनेक जण नको तितके पाणी वापरतात.
घरातील कामे झाली की, पाईप जोडतात. मग ते पाणी अंगणात, झाडांना वाया जाई पर्यंत टाकत असतात. त्यातही चारचाकी वाहने, दुचाकी वाहने तसेच जनावरे धुण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात असते. याचाही विचार होणे अंत्यत गरजेचे झाले आहे.
 

Web Title: Peepate for drinking water in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी