स्कॉर्प बांधणाऱ्या तरूणाईविरोधात थोपटले दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:17 PM2018-04-30T23:17:29+5:302018-04-30T23:17:45+5:30
पर्यटनस्थळावर गैरकृत्य तथा ओळख लपविण्यासाठी तरूणाई वर्षभर स्कॉर्प बांधून प्रवास करण्याची फॅशन केली आहे. या तरूणाईच्या विरोधात कवलेवाडा ग्रामपंचायतीने दंड थोपटले आहे. गावातून प्रवास करणाºया तरूणाई विरोधात कारवाई केली जाणार आहे.
रंजित चिंचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : पर्यटनस्थळावर गैरकृत्य तथा ओळख लपविण्यासाठी तरूणाई वर्षभर स्कॉर्प बांधून प्रवास करण्याची फॅशन केली आहे. या तरूणाईच्या विरोधात कवलेवाडा ग्रामपंचायतीने दंड थोपटले आहे. गावातून प्रवास करणाºया तरूणाई विरोधात कारवाई केली जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात असणाºया तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा ग्रामपंचायत आणि गावकºयांनी स्कॉर्प बांधून वाहनाने प्रवास करणाºया तरूणाई विरोधात दंड थोपटले आहे. स्कॉर्प बांधण्याची तरूणाईने सध्या फॅशन केली आहे. वर्षभर असे स्कॉर्प बांधून तरूणाई वावरत आहे. पर्यटन स्थळात तथा अन्य गर्दीचे ठिकाणी मुलीचे छेडखानीचे प्रमाण वाढले आहे. फॅशनचे तरूणाई न शोभणारे कृत्य करित आहे. चांदपूर पर्यटनस्थळ तथा कवलेवाडा धरण परिसरात तरूण तरूणींची गर्दी वाढली आहे. या दोन्ही ठिकाणी ये-जा करण्यासाठी कवलेवाडा गावातून तरूणाई स्कॉर्प बांधून दाखल होत आहे. यामुळे या तरूणाईची ओळख पटत नाही. अशा गर्दीचे ठिकाणी तरूणी सोबत गैरवर्तनाचे प्रकार घडले आहे. उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कॉर्प बांधण्याला विरोध नाही. परंतु हिवाळा आणि पावसाळ्यात या स्कॉर्प बांधण्याची गरज नसताना तरूणाई बेधुंद वागत आहे. स्कॉर्प बांधून गावातून प्रवास करताना अनेक अपघात घडली आहे. यामुळे वाहन धारकांची पळून जाताना ओळख निदर्शनास येत नाही. फॅशनचे नावावर अनेक अशोभनीय कृत्य तरूणाईचे हातातून घडत आहेत. यामुळे या फॅशनवर अंकुश घालण्यासाठी कवलेवाडा ग्रामपंचायत ने कंबर कसली आहे.
धरण परिसरात या आशयाचे फलक लावून थेट कारवाईचा संदेश दिला आहे. गावातून तोंडावर रूमाल आणि चेहºयावर स्कॉर्प बांधून जाणारे तरूणाई विरोधात दंड थोपटण्यात येणार आहे. या तरूणाईला पोलिसाचे स्वाधीन केले जाणार आहे. धरण परिसरात लक्ष वेधून घेणाºया या फलकाची धास्ती तरूणाईने घेतली आहे.
धरणाचे आवारात असे स्कॉर्प बांधणारी तरूणाई दिसून येत नाही. परंतु हिच तरूणाई पर्यटन स्थळ चांदपुरात दिसून येत आहे. गोबरवाही, टेमनी आणि चुल्हाड, सिहोरा मार्गाने स्कॉर्प बांधून तरूणाई दाखल होत आहे. या तरूणाई विरोधात अद्याप अंकुश घालण्यासाठी एकाही ग्रामपंचायतने पुढाकार घेतला नाही. सिहोरा परिसरातून हाकेच्या अंतरावर असणारे कवलेवाडा ग्रामपंचायतने स्कॉर्प हटाव मोहिमेला स्वच्छ समृद्ध गाव घडविण्याचे संकल्पनेत जोडले आहे. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम या गावाचे हद्दीत दिसून येत आहे. धरण शिवारात या फलकाने स्कॉर्प बांधणारे तरूणाईची गर्दी ओसरली आहे. हाच पॅटर्न सिहोरा परिसरात असणाºया ग्रामपंचायत राबविणार असल्याने दिसून येत आहे.
कवलेवाडा ग्राम पंचायत मार्फत योग्य निर्णय घेतला आहे. समाजात चांगला संदेश जाईल. यामुळे स्कॉर्प बांधणारे तरूणावर अंकुश येणार असून हाच पॅटर्न चांदपूर गावात राबविणार आहे.
-उर्मिला लांजे, सरपंच चांदपूर.
स्कॉर्प बांधून तरूणाई बेधुंदपणे वावरत आहे. अनेक अशोभनीय प्रकार घडली आहे. स्कॉर्प बांधून प्रवास करणारे तरूणाईचे अपघात घडली आहे. या प्रकारावर आळा घातले पाहिजे.
-सुनिता मोहनकर, उपाध्यक्ष महिला सेवा संघ सिहोरा.