टेलवरपर्यंत पोहचणार पेंचचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:26 PM2018-10-10T21:26:38+5:302018-10-10T21:26:57+5:30

एक महिना होऊनही शेवटच्या टोकावर पेंच प्रकल्पाचे पाणी धान शेतीत पोहचले नाही. टेलपर्यंत १० आॅक्टोबरपर्यंत पाणी द्या अन्यथा मुख्य कालव्यावर किसान सभेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा किसान सभा व पेंचच्या अधिकाऱ्यांमध्ये समेट घडले. आता ११ आॅक्टोबरपर्यंत शेवटच्या टोकावरील भात शेतीला सिंचन करण्याच्या अटीवर किसान सभेने ठिय्या आंदोलन मागे घेतले.

Pench water will reach to tail | टेलवरपर्यंत पोहचणार पेंचचे पाणी

टेलवरपर्यंत पोहचणार पेंचचे पाणी

Next
ठळक मुद्देठिय्या आंदोलन मागे : किसान सभेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : एक महिना होऊनही शेवटच्या टोकावर पेंच प्रकल्पाचे पाणी धान शेतीत पोहचले नाही. टेलपर्यंत १० आॅक्टोबरपर्यंत पाणी द्या अन्यथा मुख्य कालव्यावर किसान सभेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा किसान सभा व पेंचच्या अधिकाऱ्यांमध्ये समेट घडले. आता ११ आॅक्टोबरपर्यंत शेवटच्या टोकावरील भात शेतीला सिंचन करण्याच्या अटीवर किसान सभेने ठिय्या आंदोलन मागे घेतले.
दहेगाव, मोरगाव, कान्हळगाव, पारडी, चिचखेडा, मांडेसर, खुटसावरी आदी परिक्षेत्रातील शेवटच्या भात शेतीच्या लाभ क्षेत्रात महिना उलटूनही पेंचचे पाणी पोहचले नाही. त्यामुळे भात पीके करपली आहेत. शेतकरी मड्डा कापत आहेत. आता उर्वरित काही पिक तरी हाती येईल या आशेवर पेंचचे पाणी मिळावे यासाठी किसान सभेच्या वतीने १० आॅक्टोबर पासून ठिय्या आंदोलन केले जाणार होते. पण, तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी किसान सभेचे नेते माधवराव बांते व पेंच प्रकल्पाचे अधिकारी यांच्यात समन्वय घडविला. त्यानुसार आजच ३२० क्सुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. पाणी वितरण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. शेवटच्या टोकावर उद्यापर्यंत पाणी पोहचेल. या आश्वासनाने ठिय्या आंदोलन किसान सभेने रद्द केले. चर्चेसाठी किसान सभेचे माधवराव बांते, देवदास उपरकर, सुखचंद सुखदेवे, राधेश्याम गाठवे, सतिश बांते, हरिराम निमकर तसेच पेंचचे अधिकारी सहायक कार्यकारी अभियंता रोहित देशमुख, शाखा अभियंता एम.बी. मेश्राम, एस.एस. बोधनकर, ए.जी. उपाध्याय उपस्थित होते.

Web Title: Pench water will reach to tail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.