पेंशन हा कामगारांचा मूलभूत अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:38 PM2018-11-17T21:38:17+5:302018-11-17T21:38:36+5:30
बहुमताच्या सरकारांनी आजपर्यंत कामगार विरोधी धोरण अवलंबिले. यात जुनी १९७२ ची पेंशन योजना बंद करून दीर्घकाळ देशसेवा करून तुटपुंजे शेअर बाजारावर आधारित नवीन पेंशन योजना (एनपीए) लागू केली. यामुळे कामगारांचा सेवानिवृत्तीनंतर कौटूंबिक जीवन जगणे कठीण झाले आहे. पेंशन ही 'कंट्रीब्युटरी' नसून हा कामगारांचा मूलभूत अधिकार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय डिफेंस फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव कॉ.सी. श्रीकुमार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : बहुमताच्या सरकारांनी आजपर्यंत कामगार विरोधी धोरण अवलंबिले. यात जुनी १९७२ ची पेंशन योजना बंद करून दीर्घकाळ देशसेवा करून तुटपुंजे शेअर बाजारावर आधारित नवीन पेंशन योजना (एनपीए) लागू केली. यामुळे कामगारांचा सेवानिवृत्तीनंतर कौटूंबिक जीवन जगणे कठीण झाले आहे. पेंशन ही 'कंट्रीब्युटरी' नसून हा कामगारांचा मूलभूत अधिकार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय डिफेंस फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव कॉ.सी. श्रीकुमार यांनी केले.
आयुध निर्माणी भंडारा येथील एम्प्लॉईज युनीयन व आॅल इंडिया डिफेंस एम्प्लॉईज फेडरेशन द्वारे बहुउद्देशिय सभागृह जवाहरनगर येथे महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी राष्ट्रीय महासचिव बोलत होते. यावेळी एआयडीएफचे सचिव जे.सी.एम. डॉ.बी.बी. मजूमदार, आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवप्रसाद गणवीर, सचिव हिवराज उके, नीलेश भोंगाडे, धकाते उपस्थित होते. याप्रसंगी हिवराज उके, शिवप्रसाद गणवीर यांची भाषणे झाली. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजता कामगार रॅलीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे वसाहतीमधील सर्व कामगार बांधवांना एनपीएस अर्थात नवीन पेंशन योजना कामगार विरोधी आहे. जुनीच कौटुंबिक पेंशन लागू करा, या घोषवाक्याद्वारे जागृत करून वसाहत दुमदुमून टाकली. सायंकाळी बहुउद्देशिय सभागृहात अखिल भारतीय हास्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले. यात प्रदीप स्वामी (बालाघाट), युसुफ सागर (भिलाई), आर.बी. गुप्ता एहसास, प्रियंका रामटेके (गोंदिया), विक्के पाठक (भंडारा) यांचा समावेश होता. संचालन चर्चील कांबळे यांनी केले.