भंडारा बीडीओंच्या कक्षात पेन्शनर्स अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:46+5:302021-03-04T05:07:46+5:30
भंडारा : जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन शाखा भंडाराची पेन्शनर्स अदालत भंडारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नूतन सावंत यांच्या कक्षात घेण्यात ...
भंडारा : जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन शाखा भंडाराची पेन्शनर्स अदालत भंडारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नूतन सावंत यांच्या कक्षात घेण्यात आली.
पंचायत समिती भंडाराअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे वेतन तफावतप्रकरण, वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव, स्वग्रामभत्ता, वैद्यकीय परिपूर्ती देयक, सातवे वेतन आयोग, प्रथम हप्त्याची थकबाकी अप्राप्त, सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, तीन टक्के महागाई भत्ता, थकबाकी अप्राप्त, कर्मचारी तसेच सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन विक्रीचा लाभ संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संबंधित लिपिकास अर्ज सादर करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रलंबित समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन गटविकास अधिकारी नूतन सावंत यांनी दिले.
यावेळी पेन्शनर्स संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर साठवणे, उपाध्यक्ष जयंत उपाध्याय, विजया वंजारी, सरचिटणीस सुधाकर डुंभरे, कोषाध्यक्ष एन. एस. केसलकर, महिला सदस्य गौतमी काबंळे, ग्यानीराम भाजीपाले, चिटणीस तथा प्रसिद्धीप्रमुख प्रदीप हरडे तसेच अधीक्षक एच. एस. चौधरी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष जयंत उपाध्याय यांनी मानले.