कुष्ठरुग्ण शोध अभियानात जनतचे सहकार्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 09:57 PM2018-09-21T21:57:56+5:302018-09-21T21:58:15+5:30

जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरुग्ण शोध अभियान २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीतेसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

People need co-operation in the leprosy search mission | कुष्ठरुग्ण शोध अभियानात जनतचे सहकार्य आवश्यक

कुष्ठरुग्ण शोध अभियानात जनतचे सहकार्य आवश्यक

Next
ठळक मुद्देशांतनू गोयल : जिल्हाधिकारी कार्यालयात कुष्ठरूग्ण शोध अभियानावर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरुग्ण शोध अभियान २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीतेसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरुग्ण शोध अभियानबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलेश भंडारी, कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. नितीन वानखेडे व आरोग्य अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. नितीन वानखेडे यांच्याकडून या अभियानाबाबत सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, स्वयंसेवक यांचेमार्फत प्रत्यक्ष घरोघरी जावून कुटूंबातील सर्व सदस्यांचे त्वचा रोग तपासणी करण्यात येईल. महिला सदस्यांची तपासणी आशा वर्करमार्फत व पुरुष सदस्यांची तपासणी चमुमधील पुरुष स्वयंसेवक यांचेमार्फत करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सर्व शाळांमध्ये दैनंदिन प्रतिज्ञेच्या वेळी कुष्ठरुग्ण शोध अभियानाबाबत गावातील स्थानिक आरोग्याशी संबंधीत कर्मचारीमार्फत कुष्ठरोगाविषयी तसेच या मोहिमेबाबत माहिती देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे आठवडी प्रभातफेरीच्या दिवशी सदर मोहिमेबाबत घोषणा देण्याच्या सूचना देण्यात आले. गावपातळीवरील आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत गावातील सर्व नागरिकांना या मोहिमेमध्ये सहयोग आणि सहभाग घेण्याकरीता पंचायत समिती विभागामार्फत सूचना देण्याचे ठरविण्यात आले आहे.
जिल्हयात कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोंबर पर्यंत घरोघरी राबविण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणाचा मुख्य उद्देश जिल्हा कुष्ठरुग्ण मुक्त करण्याचा संकल्प साध्य करण्याच्या हेतूने तसेच जास्तीत जास्त नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणल्यामुळे कुष्ठरोग संर्सगाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हयात १२ लाख १५ हजार ५१ घर संख्येसाठी १११६ पर्यवेक्षकांच्या २२३ टिम यांच्या मार्फत १४ दिवस अभियान राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम राष्ट्रीय अभियान असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, सामाजिक घटक, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, प्रसार माध्यमे, शाळा, महाविद्यालय विद्यार्थी यांना व जिल्ह्यातील सर्व जनतेला घरी तपासणीसाठी आलेल्या चमुला सहकार्य करुन सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Web Title: People need co-operation in the leprosy search mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.