पवनी तालुकावासीयांनी कोरोना काळातही जपला सेवाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:33+5:302021-05-24T04:34:33+5:30

कोरोना काळात रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना व नागरिकांना त्रास होऊ नये व घरूनच काय मदत करता येईल, या सेवाभावी विचाराने ...

The people of Pawani taluka also showed service spirit during the Corona period | पवनी तालुकावासीयांनी कोरोना काळातही जपला सेवाभाव

पवनी तालुकावासीयांनी कोरोना काळातही जपला सेवाभाव

Next

कोरोना काळात रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना व नागरिकांना त्रास होऊ नये व घरूनच काय मदत करता येईल, या सेवाभावी विचाराने प्रेरित होऊन व्हाॅट्सपग्रुप तयार केला व अनेकांना हॉस्पिटलमधील बेड,ऑक्सिजन उपलब्धता, सिटी स्कॅन सुविधा याची माहिती देण्यात येत होती. अनेकांना याचा खूप फायदा झाला. सध्या देशभरात लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू असून १८ ते ४४ वयाच्या युवकांना येत्या काही दिवसात लस देण्यास सुरुवात होणार आहे, लस घेतल्यानंतर जवळपास २० ते २५ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे गरोदर माता, गंभीर रुग्ण यांच्यासाठी रक्ताचा तुटवडा पडू शकतो, ही अडचण लक्षात घेता डोन्ट वरी युवकांच्या ग्रुप तर्फे पवनी शहरात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी युवकांसाठी व महिलांसाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेला होता. भंडारा जिल्ह्यात लसीकरणाबाबत अनेक अफवा गैरसमज असल्यामुळे अनेक नागरिक महिला व युवक लसीकरण करायला जात नाही, त्यासाठी प्रत्येक रक्तदात्याला आधी रक्तदान मग लसीकरण करणारच, अशी शपथ घेऊन लसीकरण बद्दल जनजागृती करण्यात आले. या शिबिरासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले व आजूबाजूच्या लहान लहान गावांमध्ये जाऊन आव्हान करण्यात आले. नागरिक व युवकांचा उत्साह सकाळपासून सकारात्मक होता. रविवारला पवनी शहरातील बावनकर सभागृह येथे सकाळी ९ वाजता भारत माता पूजन करून व भौतिक दुरतेचे नियम पाळून भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. पवनी तालुक्यातील ज्यांनी प्रतिबंधक लस घेतलेली नाही अशा ८७ नागरिक व युवकांनी या महादानाच्या कार्यात सहभागी होऊन रक्तदान करून डॉ .हेडगेवार रक्तपेढीला रक्त सुपूर्द केले व आपल्या सेवावृत्तीचे दर्शन घडविले. त्याबद्दल समस्त पवनी तालुकावासीयांचे व रक्तदान करणाऱ्या नागरिकांचे व युवकांचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: The people of Pawani taluka also showed service spirit during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.