जखमी माकडामुळे लोक हळहळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:23 AM2017-07-22T01:23:34+5:302017-07-22T01:23:34+5:30

वन्यप्राणी, पक्षी सहवास जंगल नष्ट होत असताना राहणे व खाद्यासाठी वस्त्यांकडे धाव घेत आहे. परिणामी विजेचा धक्का लागणे,

People were moved with the injured monkey | जखमी माकडामुळे लोक हळहळले

जखमी माकडामुळे लोक हळहळले

Next

परसोडी येथील घटना : मदतीसाठी प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : वन्यप्राणी, पक्षी सहवास जंगल नष्ट होत असताना राहणे व खाद्यासाठी वस्त्यांकडे धाव घेत आहे. परिणामी विजेचा धक्का लागणे, एकमेकाशी भांडण करणे यामुळे माकडाला प्राण गमवावे लागते. अशीच घटना परसोडी आरोग्य उपकेंद्राजवळ घडली. माकडाच्या जखमी पिल्याला वाचविण्याचे आरोग्य कर्मचाऱ्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परसोडी परिसरात असलेल्या घनदाट वृक्षांवर माकडांची वसाहत आहे. लगत असलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या छतावर माकड व पिले एकमेकाशी खेळत किंवा भांडण करीत होती. दरम्यान दोन पिलाच्या भांडणाचा प्रकार विकोपाला गेला. पैकी एका पिलाला गंभीर जखम झाल्याने ते छतावर पडले. हे दृष्य पिल्याच्या आईने म्हणजे माकडाने पाहिले. आपले पिल्लू उठत का नाही हे चाचपण्यास सुरूवात केली. मात्र पिल्लू उठून बसत नव्हते. कारण त्या पिल्याचे पोट फाटलेले होते. माकडाने राधेश्याम बांगळकर यांच्या घरासमोर पिलाला ठेवले. पिल्याला गोंजारत मदतीचा टाहो फोडला. माकडाची पिलाप्रती मायेच्या ममतेने बांगळकर यांचे मन गहिवरले. उपकेंद्रातील देवतळे,साकुरे प्राथमिक उपचारासाठी धावून आले. वन विभागाला बोलाविले. पशुवैद्यकीय दवाखान्यात शर्थीचे प्रयत्न सुरू असता, पिलाने जीव सोडला. यावेळी मातेने ममत्वाने फोडलेला टाहो बघून सर्वांचे मन हेलावले.

Web Title: People were moved with the injured monkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.