आष्टीत गरदेव यात्रेला उसळणार जनसमुदाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:50 AM2018-03-02T00:50:20+5:302018-03-02T00:50:20+5:30
तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते.
ऑनलाईन लोकमत
गोबरवाही : तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते. यावर्षीदेखील येथील जंगलातून सर्व धार्मिक विधी पूर्ण करुन १५० बैलजोड्यांच्या मदतीने लाकूड ओढत आणण्यात आले. या विधीसाठी भाविकांनी श्रध्देने व उत्साहाने सहभाग घेतला.
१५० वर्षापासून धुलिवंदनाच्या दिवशी भरणाऱ्या मेघनाथ (गरदेव) वांगागरी यात्रेकरिता दर तीन वर्षांनी जंगलातून मोठे लाकूड आणल्या जात. दोन लाकूड ज्यांची सावली एकमेकांवर पडते आणि त्यांचे रंग मित्त (काळा-पांढरा) असेल असा विशिष्ट झाडांना नर-मादी आणि शिव पार्वती संबोधून पूजा अर्चना करून विधिवत १५० बैल जोड्यांच्या सहाय्याने लगतच्या हमेशा येथील जंगलातून आष्टीत भरणाºया (वांगागरी) गरदेव यात्रेकरिता दोन विशिष्ट लाकूड आणल्या गेले. आणतांना लाकूड अटकलेली शेकडो नारळ फोडल्यावरच लाकूड सामोर खेचल्या जातो अशी आख्यायिका आहे.
१५० वर्षापूर्वी बावनथडी नदीत मोठे पूर आले होते. त्यावेळी पुरात दोन मोठे लाकूड वाहत आष्टीत आले असता गावकऱ्यांनी ते लाकूड कापून अन्न शिजविण्याच्या कामात आणले असता अन्न शिजविण्याचे मातीचे भांडे (हांडी) फुटल्या गेले. अन्न वाया जावू लागला होता. त्यातच दुसºया वर्षी आष्टीवासीयांना मोठ्या दुष्काळाचा सामनाही करावा लागला. अन्न पिकविण्याकरिता पाणी तर सोडाच पिण्याचा पाणीही आष्टीवासीयांना नाही झाले नव्हते.
दरम्यान आष्टी येथीलच शिवभक्त पुजारीच्या स्वप्नात मेघनाथ, वरुण राजाने साक्षात्कार दिला व नागरिकांनी केली चूक लक्षात आणून दिली की पुरात वाहत आलेले ते लाकूड नव्हते ते साक्षात शिव पार्वती होत्या. तुम्ही त्यांना कापून जाळल्याने निसर्ग कोपला आहे.
त्यामुळे तुम्ही जंगलात अशा लाकडांचा शोध घ्या की ते रंगाने भिन्न असतील अर्थात काळे पांढरे असतील व उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची किरणे पडल्यावर एक दुसऱ्याची सावली एकमेकांवर पडेल आणि त्यातील एक झाड सरळ व दुसऱ्या झाडाला फाटा फुटला असेल नर मादी झाडे हेच शिव पार्वती आहेत. झाडांना लाकडांचा थर रचून वांगाला गर लावून चहू बाजूने फेकल्यावरच गावावरील कोप दूर होणार असे साक्षात पुजाºयाला साक्षात्कार झाल्याने गावकºयांनी धूळवडच्या दिवशीच असे विशिष्ट लाकूड जंगलातून आणून त्यांची पूजा अर्चना केली. त्याच वर्षी आष्टीकरांनी भरपूर पीक घेतले व समृद्ध झाल्याने गत १५० वर्षापासून दर तीन वर्षांनी विशिष्ट झाड शोधून धुलिवंदनाच्या दिवशी त्यावर वांग्याला गर लावून चारही दिशेने फेकल्या जाते.