अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:15+5:302021-06-25T04:25:15+5:30
भंडारा : राज्य शासनाने ७ मे रोजी शासन निर्णय जारी करून पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण बंद केले. त्यामुळे संपूर्ण एससी, ...
भंडारा : राज्य शासनाने ७ मे रोजी शासन निर्णय जारी करून पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण बंद केले. त्यामुळे संपूर्ण एससी, एसटी, व्हीजेएनटी, डीटी, एसबीसी आदी कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या संविधानिक अधिकारावर अतिक्रमण केले, अशी भावना निर्माण झाली आहे. आता शासनाच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात जनआंदोलन उभारले जाईल, असे कर्मचारी नेते व महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विनोद भोयर यांनी सांगितले. येत्या २६ जून रोजी भंडारा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धरणे देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
येथील विश्राम भवनात झालेल्या बैठकीला वीज कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष जनबधकर, शिक्षक संघटनेचे शंभू घरडे, सुधीर शेंडे, कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विनोद बन्सोड, आरोग्य सेवा संघटनेचे राजकुमार मेश्राम, भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे अमरदीप बोरकर उपस्थित होते. २६ जून रोजी भंडारा येथे आरक्षण हक्क समितीच्यावतीने धरणे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनासाठी गोळा करण्यात आलेला सहायता निधी डाॅ. विनोद भोयर यांच्या सुपूर्द करण्यात आला. सभेचे संचालन कास्ट्राइबचे सचिव आचल दामले यांनी केले. सभेला ज्ञानेश्वर राऊत, ओमप्रकाश शामकुवर, ॲड. व्ही.जी. दामले, विजय बागडे, एस.एस. साखरे, के.ए. बागडे, एन.जे. बोकडे, नरेंद्र रामटेके, झेड.ए. खान, एस.व्ही. बन्सोड, ईश्वर सव्वालाखे, मुनेश्वर रंगारी, रितेश तलमले, देशकर आदी उपस्थित होते.