पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By admin | Published: May 24, 2015 01:19 AM2015-05-24T01:19:47+5:302015-05-24T01:19:47+5:30

तालुक्यातील उमरी, अशोकनगर, फुलमोगरा या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,

People's wander for drinking water | पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

Next


भंडारा : तालुक्यातील उमरी, अशोकनगर, फुलमोगरा या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भंडारा जिल्हा विकास संघर्ष समितीचे जिल्हा सचिव अशोक बागडे यांनी दिला.
उमरी, फुलमोगरा, अशोकनगर हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या अगदी जवळ वसलेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे चौपदरी करण्याचे काम सुरु असतांना या गावांना पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन उखडल्यामुळे संबंधीत विभागाने पाणीपुरवठा करणे बंद केले होते. त्यामुळे पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात इतरत्र भटकावे लागत होते.
उमरी, फुलमोगरा, अशोकनगर या गावावरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नवीन पाईपलाईन टाकून या गावांना पिण्याच्या पाण्याची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यानुसार पाईप लाईनची व्यवस्था करण्यात आली असेल तर नियमितपणे पाणी पुरवठा करणे ही संबंधित विभागाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु याकडे संबंधित विभागाच्या अधिनस्त यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मागील पंधरा दिवसापासून नळाद्वारे करण्यात येत असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिकांना काम धंदे सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे.
नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु संबंधित विभाग सदर योजनांची अंमलबजावणी करण्यास दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभाग उमरी, फुलमोगरा, अशोकनगर या गावातील नागरिकांबाबत उपेक्षित धोरण अंगीकारून सापत्न वागणूक देत आहे हे अन्यायकारक आहे. या गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बंद असेल तर टँकरद्वारे पााणी पुरवठा केला पाहिजे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: People's wander for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.