‘आधार’ची टक्केवारी वाढली
By Admin | Published: December 31, 2015 12:26 AM2015-12-31T00:26:25+5:302015-12-31T00:26:25+5:30
राष्ट्रीय ओळखीसाठी केंद्र सरकारने काढलेल्या आधारकार्ड योजनेत (युआयडी) जिल्ह्यातून ११ लक्ष ७३ हजार २०१ नागरिकांनी आधारकार्ड बनविले आहे.
११.७५ लक्ष लोकांनी काढले आधार
इंद्रपाल कटकवार भंडारा
राष्ट्रीय ओळखीसाठी केंद्र सरकारने काढलेल्या आधारकार्ड योजनेत (युआयडी) जिल्ह्यातून ११ लक्ष ७३ हजार २०१ नागरिकांनी आधारकार्ड बनविले आहे. याची टक्केवारी ९७.७३ आहे.
सन २०११ च्या लोकसंख्येनुसार १२ लक्ष ३३४ नागरिकांपैकी ११ लक्ष ७३ हजार २०१ जणांनी आधारकार्ड बनविले आहे. यात जिल्ह्यातील ३५ ठिकाणी महा आॅनलाईनतर्फे आधारकार्ड केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. भंडारा तालुक्यात सात केंद्र असून २ लक्ष ८० हजार ३० नागरिकांपैकी २ लक्ष ६६ हजार ०६१ नागरिकांनी आधारकार्ड काढले आहेत. याची टक्केवारी ९५ इतकी आहे. मोहाडी तालुक्यात २ लक्ष १९ हजार २६५ लोकांनी आधारकार्ड काढले आहेत. मोहाडी तालुक्यात येऊन अन्य तालुक्यातील नागरिकांनी आधारकार्ड बनविल्याने मोहाडी तालुक्याची टक्केवारी १४५ इतकी आहे. तुमसर तालुक्यात २ लक्ष २६ हजार १०८ लोकसंख्येपैकी २ लक्ष ४ हजार ९८७ लोकांनी आधारकार्ड काढले. याची टक्केवारी ९०.६५ आहे. पवनी तालुक्यात १ लक्ष ५४ हजार ५८८ लोकसंख्येपैकी १ लक्ष ११ हजार ४९२ जणांनी आधारकार्ड बनविले आहेत. याची टक्केवारी ७२.१२ आहे. साकोली तालुक्यात १ लक्ष ३६ हजार ८७९ पैकी १ लक्ष ३२ हजार ९५२ जणांनी आधारकार्ड काढले असून त्याची टक्केवारी ९७.१३ आहे.
लाखांदूर तालुक्यात १ लक्ष २३ हजार ५७३ नागरिकांपैकी १ लक्ष १६ हजार ९१७ जणांनी आधारकार्ड तयार करून घेतले आहे. त्याची टक्केवारी ९४.६१ आहे. लाखनी तालुक्यात १ लक्ष २८ हजार ५४५ लोकसंख्येपैकी १ लक्ष २१ हजार ५२७ जणांनी आधारकार्ड काढले असून त्याची टक्केवारी ९४.५४ इतकी आहे. जिल्ह्यात ३५ आधारकार्ड केंद्र असून भंडारा ७, मोहाडी ७, तुमसर ५, पवनी ४, साकोली ५, लाखांदूर ३, लाखनी ४ अशी केंद्रे आहेत.
८९ हजार ३४४ बालकांची नोंदणी
० ते ५ वयोगटातील ८९ हजार ३४४ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. यात एकूण बालकांची संख्या ९४ हजार ८५९ आहे. याची टक्केवारी ९४.१८ इतकी आहे. भंडारा तालुक्यात १९ हजार ३०२, मोहाडी १३ हजार ५०, तुमसर १३ हजार ३८६, पवनी १२ हजार २९९, साकोली १० हजार ७७४, लाखांदूर १० हजार ३५ तर लाखनी तालुक्यात १० हजार ४९८ बालकांची नोंदणी करण्यात आली आहे.
मुलांच्या नोंदणीची टक्केवारी ९०
जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील मुलांच्या नोंदणीची टक्केवारी ८९.३६ इतकी आहे. यात २ लक्ष २७ हजार ४९१ मुलांची संख्या असून यातील २ लाख ३ हजार २९६ मुलांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व १३३१ शाळांमधून ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यात २६४, मोहाडी १५८, तुमसर २६१, पवनी १९७, साकोली १५५, लाखांदूर १४२ तर लाखनी तालुक्यात १५४ शाळा आहेत.