खातराेडवरचा व्यक्ती निंबू घेण्यासाठी येताे त्रिमुर्ती चाैकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:16 AM2021-05-04T04:16:22+5:302021-05-04T04:16:22+5:30
बाॅक्स महिलेला साेबत घेऊन दुचाकीवर रपेट अनेकजण पाेलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी घरातील महिलेला दुचाकीवर बसवून शहरात रपेट मारताना दिसून येतात. ...
बाॅक्स
महिलेला साेबत घेऊन दुचाकीवर रपेट
अनेकजण पाेलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी घरातील महिलेला दुचाकीवर बसवून शहरात रपेट मारताना दिसून येतात. महिला साेबत असली तर पाेलिसही काेणतीच कारवाई करीत नाहीत. शहरात अशी मंडळी सायंकाळच्यावेळी भटकंती करताना दिसत आहेत. परंतु त्यांचीही आता चाैकशी करून कारवाई करण्याची तयारी पाेलिसांनी केली आहे.
बाॅक्स
शासकीय कार्यालयातील गर्दी रस्त्यावर
शासकीय कार्यालयात हाेणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने १५ टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याचा आदेश दिला. त्यामुळे अनेक कर्मचारी घरी आहेत. मात्र ही मंडळी घरी थांबण्याऐवजी थेट रस्त्यावर फिरताना साेमवारच्या कारवाईत पाेलिसांना दिसून आली. शासकीय कार्यालयातीलील गर्दी आता रस्त्यावर हाेत असल्याचे दिसत आहे. अशा कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी ७ ते ११ या वेळेत आपली जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी. त्यानंतर कुणालाही मुभा दिली जाणार नाही, दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पाेलिसांनी सांगितले.
काेट
नियमांचा दुरुपयाेग करून कुणीही रस्त्यावर फिरू नये. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या आस्थापनेचे ओळखपत्र गळ्यात घालावे. ओळखपत्र नसेल तर आयकार्ड साेबत ठेवावे तसेच वाहनाची सर्व कागदपत्रेही साेबत ठेवणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्यात येईल.
अनिकेत भारती
प्रभारी पाेलीस अधीक्षक, भंडारा