मनरेगातून वैयक्तिक लाभांची कामे

By admin | Published: August 15, 2016 12:15 AM2016-08-15T00:15:55+5:302016-08-15T00:15:55+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे पुरक वार्षिक नियोजन व इतर वैयक्तिक लाभांची कामाबाबद सभा घेण्यात आली.

Personal benefits work from MNREGA | मनरेगातून वैयक्तिक लाभांची कामे

मनरेगातून वैयक्तिक लाभांची कामे

Next

जवाहरनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे पुरक वार्षिक नियोजन व इतर वैयक्तिक लाभांची कामाबाबद सभा घेण्यात आली. या सभेला पंचायत समिती भंडारा येथे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.
मनरेगा अंतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ चे पुरक व वार्षिक अंदाजपत्रक तयार करताना घ्यावयाची काळजी व उपाय, आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणात पात्र व अपात्र घरकुल लाभार्थ्यांविषयी चर्चा करण्यात आली. वैयक्तिक लाभाची कामे करण्यासाठी ११ कलमी कार्यक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार सिंचन विहिरी, शेततळे, व्हमी कंपोस्टींग (सेंद्रीय खत), नाडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, शौचालय, वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपातील शोषखड्डे, गायव तलाव , पारंपारिक पाणीसाठ्याचे नूतनीकरण व गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, पुनर्जीवन वृक्षलागवड, संगोपन व संरक्षण, ग्रामसबलीकरण यात क्रीडांगण, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, गावाअंतर्गत रस्ते, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, शेळीपालन शेड, मत्स्य व्यवसाय ओटे यांचा समावेश आहे. ही सर्व कामे साठ बाय चाळीस या प्रमाणात करावयाची आहे. या सर्व कामांची माहिती गट विकास अधिकारी मंजुषा ठवकर यांनी दिली. ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचा पंचायत समिती सभावर बहिष्कार असल्याने ते गैरहजर होते. यावेळी विस्तार अधिकारी भीमगीरी बोदेले, तालुका मनरेगा समन्वयक नंदेश्वर, तांत्रिकी व कृषी पॅनलचे अधिकारी, ग्रामरोजगार सेवक सरपंच मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Personal benefits work from MNREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.