क्रीडा स्पर्धेतूनच व्यक्तीमत्त्वाचा विकास
By admin | Published: January 30, 2016 12:41 AM2016-01-30T00:41:38+5:302016-01-30T00:41:38+5:30
शालेय शिक्षणासोबतच व्यक्तीमत्व विकासात क्रिडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्व आहे, खेळाडूंनी निसंकोचपणे क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन व्यक्तीमत्वाचा विकास साधावा,...
सुभाष गांगरेड्डीवार : बम्लेश्वरी नवदुर्गा उत्सव मंडळाकडून कुस्ती स्पर्धेचे आयोजन
भंडारा : शालेय शिक्षणासोबतच व्यक्तीमत्व विकासात क्रिडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्व आहे, खेळाडूंनी निसंकोचपणे क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन व्यक्तीमत्वाचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी केले.
मॉ बम्लेश्वरी नवदुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेद्र पातुरकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, पोलिस निरिक्षक जयंवत चव्हान उपस्थित होते. या स्पर्धेत २०० पुुरुष आणि ७४ महिला सहभागी झाले होते. कुस्ती स्पर्धेत खुला गटातून अमरावतीचा नदीम खान हा अव्वल ठरला. पुसदचा विशाल डाके हा द्वितीय, हरयाणाचा सुनिल रोहतक हा तृतीय तर औरंगाबाद श्रीकांत काजळे याने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. विभागीय पुरू ष गटात गोंदियाचा परमेश्वर चौहान हा प्रथम, चिचाळचा निलेश दमाहे हा द्वितीय, नागपूरचा नितेश राऊ त हा तृतीय नूर बादशहा याने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. महिला गटात सुकळी येथील गीता चौधरी प्रथम, चिचाळ येथील शितल सव्वालाखे द्वितीय तर संगीता टेकाम ही तृतीय क्रमांकाची विजेती ठरली. स्पर्धेचे पंच म्हणून रामटेकचे शेषराव बांते, वामन बांते, ईश्वर मेश्राम, सेवक गडे, महिला पंच रेणू भारती यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी संतोष घोगरे, राजेश चोपकर, सुर्यकांत इलमे, विजय गाढवे, अमीत बिसने, भूषण काळे, प्रकाश काकडे, चेतन काळे, गजानन नेमाळे आदींनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)