हरभरा पिकावरील कीडरोग व्यवस्थापन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:39 AM2021-01-16T04:39:19+5:302021-01-16T04:39:19+5:30

अविनाश कोटांगले : पक्षी थांबे उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन भंडारा : रब्बी हंगामात हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ...

Pest disease management on gram crop is important | हरभरा पिकावरील कीडरोग व्यवस्थापन महत्त्वाचे

हरभरा पिकावरील कीडरोग व्यवस्थापन महत्त्वाचे

Next

अविनाश कोटांगले : पक्षी थांबे उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

भंडारा : रब्बी हंगामात हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भंडारा तालुक्यात हरभरा पिकाची एक हजार ८५७ हेक्‍टरवर लागवड झाली आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे, तसेच हवेत आर्द्रता वाढल्याने किडींसाठी वातावरण पोषक असल्याने किडींची दुपटीने वाढ झाली आहे. सध्या हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत असल्याने, खत, पाणी व्यवस्थापन करून किडींचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे मत भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी व्यक्त केले.

ते भंडारा तालुक्यातील बेला येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर सध्या घाटेअळीचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी करताना बीजप्रक्रिया करून ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम रायझोबियमची बीज प्रक्रिया करून पेरणी केल्याने, बियाणे चांगल्या पद्धतीने उगवून रोपे निरोगी आणि रोगमुक्त होतात. घाटे अळीने हरभरा पिकाचे ३० टक्के नुकसान होऊ शकते, यासाठी शेतकऱ्यांनी दशपर्णी अर्क, वनस्पतीजन्य कीटकनाशक निंबोळी अर्क ५% अळीचा प्रादुर्भाव दिसताक्षणी करावी. जैविक कीटकनाशक एचएनपीव्ही ५०० मिली ५०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यासोबतच शेतकऱ्यांनी हरभरा पिकामध्ये झेंडू या सापळा पिकांची, तसेच २०० ग्रॅम प्रति हेक्‍टरी मका पिकाचे बियाणे हरभऱ्यासोबत पेरणी करावी. त्यामुळे पक्षी मका झाडावर बसून कीड उचलून खातात. पिकामध्ये हेक्‍टरी १० ते १२ कामगंध सापळे लावावे. पक्ष्यांना बसण्यासाठी दर पंधरा ते वीस मीटर अंतरावर पक्षी थांबे उभारावे. यामध्ये कोळसा, साळुंकी हे पक्षी पिकावरील किडे पकडून खातात. यामुळे कमीतकमी खर्चात शेतकऱ्यांचे होणारे पिकाचे नुकसान टळू शकते. यावेळी भंडारा तालुका कृषी अधिकाऱ्यांसमवेत पाहणीदरम्यान भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, पर्यवेक्षक कांबळे, कृषिसेवक योगिनी भगत यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील काही गावांना भेटी देण्यात आल्या. अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

बॉक्स

किडींचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास अशा करा उपाययोजना

हरभरा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करूनही कीड नियंत्रण न झाल्यास कीटनाशक कलोरोपायरिफॉस २० ईसी २० मिली १० लीटर पाण्यात मिसळून, क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली १० लिटर पाण्यात, ईमामेक्टिन बँझोएट ५ एसजी ०४ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, यासोबत फेरोमन ट्रॅप हेक्टरी ५ बसवावे. पिकामध्ये २-३ फूट उंचीचे पक्षी थांबे उभारावे, यामुळे कीड नियंत्रण करण्यासाठी मदत मिळते. अधिक माहितीसाठी कृषी सहायक यांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Pest disease management on gram crop is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.