धान पिकावर कीडींचा प्रादुर्भाव

By admin | Published: August 18, 2016 12:25 AM2016-08-18T00:25:30+5:302016-08-18T00:26:39+5:30

जिल्ह्यात धान पीकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

Pests of pests on paddy crop | धान पिकावर कीडींचा प्रादुर्भाव

धान पिकावर कीडींचा प्रादुर्भाव

Next

कृषी विभागाच्या उपाययोजना : धान पिकावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन वेळीच करा
भंडारा : जिल्ह्यात धान पीकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पावसाची दीर्घ उघड व बांधीत पाणी नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असताना कीडीचा प्रकोप त्यांच्या मानगुटीवर बसला आहे. शासन प्रशासनाने कीटकनाशक औषधींचा शेतकऱ्यांना पाठपुरावा करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. कीडींचा बंदोबस्त वेळीच करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
लष्करी अळीचा पतंग मध्यम आकाराचा १ ते २ से.मी. लांब असून समोरील पंख पिंगट व त्यावर काळसर ठिपका व कळेवर नागमोडी पट्टे असतात. पूर्ण वाढलेली अळी २.५ अड्याळ ते ४ से.मी. लांब, लठ्ठ, मऊ, हिरवी आणि अंगावर लाल पिवळसर उभ्या रेषा असतात. मादी २०० ते ३०० अंडी समुहाने, पुंजक्यांच्या स्वरुपात धानावर तसेच गवतावर घालते. अंडी करड्या रंगाच्या केसांनी झाकलेले असतात. अंडी अवस्था ५ ते ८ दिवस, अळी अवस्था २० ते २५ दिवस व कोषा अवस्था १० ते २५ दिवसांची असून कोष धानाच्य बुंध्याजवळील बेजक्यात तसेच जमिनीत आढळतात. लष्करी अळींची एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात.
लष्करी अळीचे प्रादुर्भाव झालेल्या साकोली तालुक्यातील किन्ही एकोडी या गावाची पाहणी जिल्हा वरिष्ठ भात पैदासकार जी.आर. शामकुवर, कीटकशास्त्रज्ञ डॉ.बी.एन. चौधरी, अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर, उपविभागीय कृषी अधिकरी बी.एन. सांगळे, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, कृषी अधिकारी के.एम. बोरकर या चमुने केली.
बांधी स्वच्छ ठेवणे, अळींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास चुडात किंवा जमिनीवर दिसणाऱ्या अळ्या, गोळा करून नष्ट कराव्या. धानाच्या बांधीत पाणी साठवून ठेवून पिकावरून दोर किंवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून लष्करी अळ्या पाडाव्यात, लष्करी अळीचे नियंत्रणासाठी डायक्लोरव्हास ७६५ इसी, १२.५० मिली, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खोडकिडा नियंत्रणासाठी शेतात ५ टक्के कीडग्रस्त फुटवे दिसताच क्विनॉलफॉस ३२ मिली, प यती १० लिटर पाणी या प्रामणात मिसळून फवारावे. अथवा ट्रायकोग्रामा जॅपोनिकम हे परोपजीवी कीटक हेक्टरी ५० हजार या प्रमाणात दर ७ दिवसाचे अंतराने ४ ते ४ वेळा सोडावे.
गादमाशी नियंत्रणासाठी गादमाशी प्रवण क्षेत्रात रोवणीनंतर १० आणि ३० दिवसांनी तर इतर क्षेत्रात ५ टक्के, चंदेरी पोंगे इतका प्रादुर्भाव आढळताच दाणेदार फोरेट १० टक्के १० किलो अथवा क्विनॉलफॉस ५ टक्के १५ किलो प्रती हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सेंमी. (३ ते ४ इंच) पाणी असताना टाकावे. बांधीतील पाणी चार दिवसपर्यंत बांधीबाहेर काढून ये. अथवा गराडीचे पाने १.५० टन प्रती हेक्टर या प्रमाणात चिखलणीचे वेळी शेतात टाकावीत. यामुळे तुडतुडे आणि खोडकिडींचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. तुडतुडे नियंत्रणासाठी नत्र खताची वाजवीपेक्षा जास्त मात्रा वापरू नये. प्रत चुड ५ ते १० तपकीरी तुडतुडे दिसतात इमिडॅक्लोप्रीड १७.८ एस.एल. २.२ मि.ली. किंवा फिप्रोनिल ५ मि.ली. किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्लू.जी. २ ग्रॅम किंवा मिलथिआॅप ५० टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा फेन्थोएट ५० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मि.ली. यापैकी एक किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अथवा म्युकर हिमॅलीस किंवा मेटा हायझियम अ‍ॅनोसोपली ही जैविके २.५० किलो प्रतीहेक्टर या प्रमाणात द्यावीत. देण्यापूर्वी बांधीतील पाणी काढून टाकावे, अशा उपाययोजना कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Pests of pests on paddy crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.