पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला, तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:36 AM2021-01-19T04:36:31+5:302021-01-19T04:36:31+5:30

भंडारा : पेट्रोल व डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे याचा परिणाम महागाईवर होत असून, सर्वसामान्यांना जीवन जगताना कसरत ...

Petrol-diesel prices skyrocket, but we don't care | पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला, तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही

पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला, तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही

Next

भंडारा : पेट्रोल व डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे याचा परिणाम महागाईवर होत असून, सर्वसामान्यांना जीवन जगताना कसरत करावी लागत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर दरवाढ होत तब्बल वीस रुपयांची दरवाढ झाली आहे. फक्त पेट्रोलच्या किमतीत वाढ झालेली नाही, तर डिझेलही महाग होत असल्याने वाहतूक व्यवस्थाही महागली आहे. त्याचा परिणाम सर्वच गोष्टींवर दिसून येत आहे.

यापूर्वी सरकार एक ते दीड महिन्याच्या फरकाने दरवाढ करीत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्याने तेल कंपन्यांनी प्रचंड भाववाढ केली आहे. त्यामुळे सरकारकडून प्रति लिटर पेट्रोलमागे दोन ते पाच रुपये दरवाढ केली जात आहे. मात्र केंद्र सरकारकडून दरवाढीचा निर्णय होताच सामान्य नागरिक तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते सरकार विरोधात आंदोलन करायचे. सर्वजण कामे सोडून अनेकजण दरवाढीचा विरोध करण्यासाठी एकवटायचे. मात्र अलीकडील काही दिवसांत मात्र ही आंदोलने होताना दिसत नाहीत. सातत्याने होणारी भाववाढ लक्षात घेता सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. अलीकडे काही दिवसापासून जवळपास दर दिवशी पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ होत आहे. असे असताना ग्राहकांच्या लक्षात येत नाही. २०१७च्या जानेवारी महिन्यामध्ये पेट्रोल ७८.०२, तर डिझेल ६०.९१ इतके होते. २०१८ मध्ये पेट्रोल ७८.२३ रुपये, तर डिझेल ६२.८०रुपये होते. तर २०१९मध्ये पेट्रोल ७४.८० तर डिझेल ६५.०६, २०२०मध्ये पेट्रोल ८१.२९ तर डिझेल ७०.७१ आणि आता जानेवारी २०२१मध्ये पेट्रोल ९०.८० तर डिझेल ७०.८७ रुपये इतकी प्रचंड भाववाढ झाली आहे. दरदिवशी कमी-अधिक प्रमाणात दरवाढ होत असतानाही ग्राहक मात्र संयमी असल्याचे दिसत आहे. कोणीही सरकारविरोधात निदर्शने आंदोलने करताना दिसून येत नाहीत. मात्र या दरवाढीचा फायदा सरकारला होत असून, सरकारने सर्वसामान्यांचे हित लक्षात घेता सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

बॉक्स

महागाईत पडली भर

डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक व्यवसायासह बोरवेल, ट्रान्सपोर्ट व्यवस्था, एसटी व खासगी बसेसच्या तिकिटात प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतीची मशागत करण्यापासून ते अनेक ये-जा करणारे कर्मचारी व रुग्णांनादेखील याचा फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत उत्पन्न वाढत नसल्याने शेतकरीही याचा विरोध करीत आहेत.

कोट

यापूर्वी सरकार एक ते दीड महिन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर वाढ करीत होते. त्यामुळे झालेली दरवाढ ही ग्राहकांना समजत होती. त्यावर तत्काळ सर्वसामान्यांसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दरवाढ मागे घेण्यासाठी आंदोलने करत होते. मात्र अलीकडे पेट्रोल, डिझेलची झालेली प्रचंड दरवाढ ही सर्वसामान्यांना जगताना नाकीनव येत असल्याने शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा दरवाढीविरोधात निषेध केला जाईल.

संजय आकरे, शिवसेना विभागप्रमुख

बॉक्स

२०१७ जानेवारीमध्ये पेट्रोल ७८.०२ रुपये, तर डिझेल ६०.९१

२०१८ जानेवारीमध्ये पेट्रोल ७८.२३ रुपये, तर डिझेल ६२.८०

२०१९ जानेवारीमध्ये पेट्रोल ७४.८०, तर डिझेल ६५.०६

२०२० जानेवारीमध्ये पेट्रोल ८१.२९, तर डिझेल ७०.७१

२०२१ जानेवारीमध्ये पेट्रोल ९०.८०, तर डिझेल ७९.७८ रुपये इतकी प्रचंड भाववाढ झाली आहे.

Web Title: Petrol-diesel prices skyrocket, but we don't care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.