पेट्रोल-डिझेलचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:50 PM2018-05-24T22:50:57+5:302018-05-24T22:51:11+5:30

राज्य तथा केंद्र सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Petrol-Diesel Splash | पेट्रोल-डिझेलचा भडका

पेट्रोल-डिझेलचा भडका

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलन : जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य तथा केंद्र सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाभरात नागरिकांनी या दरवाढीच्या संदर्भात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त कोल असून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे.
या संदर्भात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. देशात पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढलेल्या असून त्यामुळे सर्वसामान्य माणसाची आर्थिक लूट होत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर हे आज पर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त दर आहेत. वाढलेल्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या असून त्यामुळे महागाई आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. शेतकरी मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहेत.
पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमती कमी करून सामान्य जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे. परिणामी शासनाला जनतेच्या रोषाला सामोर जावे लागेल.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, दिपक गजभिये, धनराज साठवणे, शंकर राऊत, आणिक जमा पटेल, अजय गडकरी, अवैस पटेल, सुनील गिºहेपुंजे, मंगेश हुमणे, प्रशांत देशकर, प्रा.टी.डी. मारबते, संजय वरगनटीवार, प्रकाश डोनेकर,सुकराम देशकर, रोशन दहेकर, विनय बागडे, सचिन गिरहेपुंजे, नाहीद परवेज,अंकुश वंजारी, हेमंत मलेवार,हरिराम निमकर, भोलाराम साठवणे, प्रदीप वाडीभस्मे, गणेश लीमजे मोहाडी,जिवन भजनकर, जागेशवर बडगे इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Petrol-Diesel Splash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.