पेट्रोल दरवाढीमुळे नागरिकांमध्ये ‘आक्रोश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:26 PM2018-05-21T23:26:29+5:302018-05-21T23:27:07+5:30
सामान्य माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या पेट्रोलच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८४ रूपयांवर पोहचला असून ऐन लोकसभा पोट निवडणुकीच्या काळात या भाववाढीमुळे जनसामान्यांमध्ये आक्रोश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सामान्य माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या पेट्रोलच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८४ रूपयांवर पोहचला असून ऐन लोकसभा पोट निवडणुकीच्या काळात या भाववाढीमुळे जनसामान्यांमध्ये आक्रोश आहे.
यापूर्वी वर्षातून किमान दोन वेळा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ व्हायची. त्या तुलनेत सद्यस्थितीत सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मागील काही महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात नित्याने वाढ करीत आहे. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे.
१६ जून २०१७ ला पेट्रोलचे दर ७६.३४ पैसे होते. हे दर आता अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर चक्क ८४ रूपयांवर पोहचले आहे. या अकरा महिन्यात पेट्रोलच्या किमतीत आठ रूपयांनी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर शंभरी तर गाठणार नाही ना? अश भीती वाहनचालकांना वाटू लागली आहे. इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून नागरिकांना वाहनांकरिता पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात येत आहे. यासह अन्य कंपन्यांच्या पेट्रोलपंपाच्या माध्यमातून पेट्रोलची सुुविधा उपलब्ध आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याने वाहनधारकांची एकप्रकारे लुट सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये आहे.
पेट्रोलच्या दरवाढीचा चढता आलेख
जानेवारी महिन्याच्या १ तारखेला पेट्रोलचे दर ७८.२३ रुपये प्रतीलिटर होते. डिझेलच्या किमतीत तब्बल ७.२१ रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेल १ जानेवारीला ६२.८० रु. प्रतीलिटर होते. त्यात वाढ होऊन ६६.६६ रुपये भाववाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा भाववाढ झाली. पंधरवाडापूर्वी सोमवारच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने दिसूून आले. सोमवारला ८४.०४ पैसे पेट्रोलचे दर होते. त्यात डिझेलच्या दरातही चांगलीच वाढ दिसून येत आहे.
सोअल मीडियावर फिरतोय संदेश
दुसरीकडे सोशिअल मीडीयावर पेट्रोल भरताना नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले जात आहे. ५०, १००, १५० तथा २०० रूपयांचे पेट्रोल न भरता ते ३०, ४०, ६०, ७०, ८०, ९०, ११०, १२०, १३०, १४० रूपये अशा आकड्यांमध्ये भरावे. ठोक आकड्यांची सेंटींग होत असल्याने ग्राहकांना पेट्रोल कमी मिळत असते, अशी माहिती असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर विशेषत: व्हॉट्सअॅपवर बघायला मिळत आहे. काहीही असो नागरिक भाववाढीला घेऊन चांगलेच संतापले आहेत.
जिल्ह्यात ४६ पट्रोलपंप
जिल्ह्यात ४६ पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपवर महिनाभरात अंदाजे सुमारे ७ लाख लिटर पेट्रोल व ३० लाख लिटर डिझेल विक्री होते. दरवाढीत लाखो रुपयांचा फायदा होतो तर याचा सर्वसामान्यांना फटका बसतो.