सुदृढ आरोग्यासाठी फार्मासिस्ट खरा जीवलग मित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:56 PM2017-11-27T23:56:10+5:302017-11-27T23:56:43+5:30

दुषित वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे. यामुळे अनेकांना व्याधीने ग्रासले आहे.

Pharmacist is a true best friend for healthy health | सुदृढ आरोग्यासाठी फार्मासिस्ट खरा जीवलग मित्र

सुदृढ आरोग्यासाठी फार्मासिस्ट खरा जीवलग मित्र

Next
ठळक मुद्देप्रभाकर कळंबे : फार्मासिस्ट सप्ताहानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : दुषित वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे. यामुळे अनेकांना व्याधीने ग्रासले आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकांनी डॉक्टर व फार्मसिस्टचा सल्ला घेवूनच औषधोपचार करावा. डॉक्टरला अनेकजण देव मानतात तसेच फार्मसिस्ट हे जीवलग मित्र म्हणून त्याचा सल्ला घेवून आरोग्य सुदृढ ठेवावे असे प्रतिपादन मुख्य औषध निर्माण अधिकारी प्रभाकर कळंबे यांनी व्यक्त केले.
फार्मसी सप्ताहानिमित्त वरठी येथील अनुराग कॉलेज आॅफ फार्मसी येथे पार पडलेल्या ५६ व्या राष्टÑीय फार्मसी सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर युनिव्हरसिटी डिपार्टमेंट आॅफ फार्मास्युटीकल सायन्स कॅम्पसचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश इटनकर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य औषध निर्माण अधिकारी अरविंद बावणकर, प्रभाकर कळंबे, अनुराग कॉलेज आॅफ फार्मसीचे (बी.फार्मसी) प्राचार्य डॉ. एस. पी. वाते, अनुराग कॉलेज आॅफ फार्मसीचे (डी. फार्मसी) चे प्राचार्य लोहे, कार्यक्रम समन्वय प्रा. कुमुदीनी धुर्वे, प्रा. दिनेशकुमार लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी राष्टÑीय फार्मसी सप्ताह देशभरात साजरा करण्यात येतो. योग्य प्रकारे औषधी घेतल्यास आरोग्य चांगले राहते. मात्र त्याचा दुरुपयोग केल्यास औषध विषारी बनु शकतात. म्हणून औषधांबद्दल पुरेपुर माहिती प्राप्त व्हावी याअनुषंगाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सप्ताहानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात २० पदविका विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी डॉ. प्रकाश इटनकर यांनी फार्मसीस्ट आणि त्यांच्याकडील उपलब्ध संधी व आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एस. पी. वाते यांनी फार्मसीस्ट कशाप्रकारे मदत करु शकतो. याबद्दल मार्गदर्शन करुन व्यवसायाचा मान उंचावण्यासाठी त्यांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी कुमुदिनी धुर्वे यांच्यासह अन्य मान्यवरांनीही समायोचित मार्गदर्शन केले. वादविवाद स्पर्धेत शांताबाई पाटील इन्स्टीट््युट आॅफ डिप्लोमा इन फार्मसीची मेघा बजाज हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर अनुराग कॉलेज आॅफ फार्मसीच्या पराग भोयर याने द्वितीय तर तृतीय क्रमांक छत्रपती शिवाजी कॉलेज आॅफ फार्मसीच्या मयुर चवरे याने पटकाविला. यावेळी फार्मसीस्टचे स्थान समाजात अढळ राहावे यासाठी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आसीफ शेख यांनी केले तर आभार प्राचार्य सचिन लोहे यांनी मानले.
बावनकर, कळंबे यांचा सत्कार
जिल्हा सामान्य रुग्णालयात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अरविंद बावणकर व जिल्हा परिषद येथे मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रभाकर कळंबे यांनी फार्मसी व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे. या दोघांच्या कार्याची दखल घेवून फार्मसी सप्ताहाच्या कार्यक्रमात त्यांचा मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

Web Title: Pharmacist is a true best friend for healthy health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.