फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 09:19 PM2017-07-30T21:19:23+5:302017-07-30T21:20:00+5:30

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या द्वय महामानवांचे कार्य भारत देशातील समस्त समाजाला योग्य दिशा व प्रेरणारे देणारे आहे.

phaulae-daamapatayaannaa-bhaarataratananae-sanamaanaita-karanayaacai-maaganai | फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याची मागणी

फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या द्वय महामानवांचे कार्य भारत देशातील समस्त समाजाला योग्य दिशा व प्रेरणारे देणारे आहे. केंद्र व राज्य सरकारने याप्रकरणी वेळीच दखल घेऊन व सम्यक विचार करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणारा धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देणारा योग्य न्याय प्रदान करावा, अशी मागणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मिशनने केली आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना इंग्रज राजवटीत अन्याय, अत्यचार, शोषणाविरुद्ध लढा उभारला होता. तसेच भारत देशातील शोषित पीडित सामान्य नागरिकांना त्यांचे जन्मजात हक्क, अधिकार मिळावे यासाठी जीवाचे रान केले आणि पुण्यामध्ये १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करून बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दार खुले केले. यास भारत देशातील जातीवादी व्यवस्थेने त्यांचा फार मोठा विरोध केला होता. परंतु त्यास न जुमानता क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण क्षेत्रात तयार करून त्यांचे शैक्षणिक जबाबदारी सोपविली व सावित्रीबाई फुले यांना कशाचीही तमा, मान सन्मान न पाहता ती जबाबदारी निर्भीडपणे पार पाडली आहे. सावित्रीबाई फुले या भारत देशातील बहुजन समाजाच्या पहिल्या आद्यशिक्षिका आहेत. साथ पसरली असता रुग्णांची सेवा करताना त्या मृत्यू पावल्या. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना शेतकरी, शेतमजूरांच्या उत्थानासाठी बरेच भरीव कार्य केले असून शेतकºयांच्या आसूड या ग्रंथात शेतकºयांबाबत विस्तृत लेखन करून शेतकºयांचे हित जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे फुले दांपत्यांचे कार्य सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रास प्रेरक ठरत असून नवी दिशा देणारे असताना या दांपत्यांना अजूनपर्यंत या दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही. हे न्याय व तर्कसंगत नसून याबाबद संबंधित यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून बहुजन समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.
याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन व मानविद्य दृष्टीकोनातून सम्यक विचार विनिमय करून क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून तमाम नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशनचे जिल्हाअध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, गौतम कानेकर, इंजि. अजय रंगारी, अशोक बागडे, धनराज कानेकर, अशोक फुलेकर, हितेंद्र मेश्राम यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: phaulae-daamapatayaannaa-bhaarataratananae-sanamaanaita-karanayaacai-maaganai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.