घरात दडलेल्या डुकरांचा वृद्धावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 15:02 IST2024-05-23T15:01:59+5:302024-05-23T15:02:47+5:30
वृध्द गंभीर : पवनी शहरातील घटना

Pigs hiding in the house attack the old man
भंडारा : नवनिर्माण घरामध्ये दडलेल्या रानडुकरांनी अचानक एका ६५ वर्षीय वृध्दावर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी पवनी शहरातील शेषनगर, पवनी येथे घडली. गणपती देशमुख यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. गणपती विठोबा देशमुख, असे जखमी वृध्दाचे नाव आहे.
जंगलात किंवा शेतात गेल्यावरच त्याच्यावर प्राणी हल्ला करतात असे ऐकण्यात होते. परंतु आता प्राण्यांनी आपला हल्ला गावाकडे वळवला असून माणूस वस्तीमध्ये सुरक्षित नाही याची प्रचिती या घटनेमुळे बघायला मिळाली. उन्हाळ्यात पाणी व अन्नाच्या शोधासाठी जंगली प्राणी गावाकडे धाव घेतात. गणपती देशमुख हे नवनिर्माण घरावर पाणी मारण्यासाठी गेले होते. पाणी मारुन झाल्यानंतर घराकडे निघत असताना घरामध्ये लपून बसलेल्या रान डुकरांच्या कळपाने अचानक गणपती देशमुख यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली असून ते सिमेंट रस्त्यावरर फेकला गेले. त्यामुळे मुका मार लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुलगा हरेश देशमुख घटनास्थळी येऊन वृद्धाला ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. घटनेची माहिती पवनी वन कार्यालयाला देण्यात आली. वृद्धाला नुकसान भरपाई देण्याची मागणी कुटूंबियांनी केली आहे.