खांब कोसळला; २६ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:10 PM2018-05-06T22:10:10+5:302018-05-06T22:11:23+5:30

कारधा टोल प्लाझा नजिक असलेल्या वीज खांबाला ट्रकने धडक दिली. त्यामुळे कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारांमध्ये बिघाड आला. परिणामी गडेगाव उपकेंद्रातून अनेक फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला.

Pillar collapsed; 26 villages in the dark | खांब कोसळला; २६ गावे अंधारात

खांब कोसळला; २६ गावे अंधारात

googlenewsNext
ठळक मुद्देरात्र उकाड्यात : वीज कंपनीविरूद्ध आक्रोश, १० तासानंतर वीज पुरवठा पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कारधा टोल प्लाझा नजिक असलेल्या वीज खांबाला ट्रकने धडक दिली. त्यामुळे कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारांमध्ये बिघाड आला. परिणामी गडेगाव उपकेंद्रातून अनेक फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला. याचा फटका भंडारा व लाखनी तालुक्यातील शेकडो नागरिकांना बसला. ६ मे रोजी रात्री १ वाजतापासून जवळपास अनेक गावातील शेकडो नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली़ वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांनी वीज वितरण कंपनीविरूध्द संताप व्यक्त केला़
महाराष्टÑ राज्य शासनाने राज्य भारनियमन मुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी भंडारा जिल्ह्यात विजेचा लपंडाव नित्याचेच झाले आहे. परिणामी ऊन्हाच्या चटक्यासोबत तांत्रिक कारणांची झळ नागरिकांच्या मानगुटीवर बसली आहे. पारा ४४ अशांवर असताना रविवार रोजी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली नसतानाही ३३ के. व्ही. गडेगाव उपकेंद्रातील वीजपुरवठा खंडीत झाला. याविषयी माहिती जाणून घेतली असता कारधा नजिक असलेल्या वीज खांबाला ट्रकने धडक दिली. त्यामुळे धारगाव फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत असल्याचे सांगण्यात आले. परीणामी गडेगाव उपकेंद्रातंर्गत असलेल्या लाखनी, एमआयडीसी, गडेगाव व धारगाव या फिडरमार्फत असलेल्या अनेक गावांचा वीज पुरवठा रात्री ९ वाजता खंडीत झाला़ वीज अधिकाºयांनी रात्रभर नादुरुस्त वीज तारांची दुरुस्ती केली.अखेर १० तासानंतर वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला. दरम्यान लाखनी व भंडारा तालुक्यातील शेकडो नागरिकांना मात्र डासांच्या प्रादूर्भावात रात्र उकाड्यात काढावी लागली. वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली.
वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ
रविवारला भंडारा व लाखनी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली, या विषयी वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते अनभिज्ञ असल्याचे कळले. अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी याविषयी उपविभागिय अधिकारी बी. ए. हिवरकर यांच्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. तर हिवरकर यांनी रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात असल्याने नंतर संपर्क करणार असल्याचे सांगितले. तीन ते चार तासानंतर त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर दोनदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
गावकऱ्यांनी रात्र काढली जागून
आमगाव/दिघोरी : धारगाव विद्युत उपकेंद्रांतर्गत येत असलेले २६ गावातील विद्युत पुरवठा रात्री १ वाजेपासून खंडीत झाल्याने अंधार पसरला होता. विद्युत खंडित झाल्याने गावकऱ्यांची रात्री झोपण्याची गैरसोय झाली होती. चौकाचौकामध्ये गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. राष्ट्रीय महामार्ग कारधा येथे एका ट्रकने विद्युत खांबाला धडक दिल्याने लाखनीपर्यंत वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या सयंत्रावरुन विद्युत पुरवठा बंद झाला. हे काम सुरळीत करण्यासाठी सकाळ उजाडवी लागली. रात्रीला १ वाजेपासून विद्युत बंद होती. कुलर पंखा यांची सर्वांना सवय झाल्याने गावकऱ्यांची झोपमोड झाली. अनेकांनी आपले अंधरुण अंगणामध्ये काढले. लहान मुलाना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. तान्ह्या मुलांना झोपविण्यामध्ये मोठ्याची फार पंचाईत झाली.

कारधा नजिकच्या पथदिवा खांबाला ट्रकने धडक दिल्याने कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाºया वीज तारावर खांब कोसळला. त्यामुळे गडेगाव उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा खंडीत झाला. धारगाव फिडवरील २६ गावे अंधारात होती. लाखनी फिडरला 'बॅक फिडींग' देण्यात आल्यामुळे तेथील वीजपुरवठा सुरळीत होता. क्रेनच्या सहायाने खांबावरील वीज तारा काढण्यात आली. रात्रभर केबलची दुरूस्ती करण्यात आल्यानंतर सकाळपर्यत वीज पुरवठा सुरू करण्यात आला़
- एम. के. सिंह
कनिष्ठ अभियंता, धारगाव

Web Title: Pillar collapsed; 26 villages in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.