कोंढा येथे मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:24 AM2021-06-29T04:24:00+5:302021-06-29T04:24:00+5:30
कोंढा -कोसरा: कोंढा येथे राज्यमार्गावर रस्ता खोदकाम करून ठेवले, पण ते काम बांधकाम कंपनीने केले नसल्याने मुख्य मार्गावर खड्डेच ...
कोंढा -कोसरा: कोंढा येथे राज्यमार्गावर रस्ता खोदकाम करून ठेवले, पण ते काम बांधकाम कंपनीने केले नसल्याने मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखलमय झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कारधा निलज राज्य मार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. ते काम कासवगतीने होत असल्याने या मार्गावर ठिकठिकाणी अर्धवट काम केलेले दिसते आहे. कोंढा व कोसरा या दोन्ही गावाच्या मध्यातून राज्यमार्ग जातो, येथील जवळपास दीड किलोमीटर मार्ग कंपनीने मागील दोन महिन्यांपूर्वी खोदकाम करून ठेवले, पण ते काम पूर्ण न केल्याने मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच सर्वत्र मातीयुक्त चिखल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
येथील मुख्य बाजारपेठ राज्यमार्गावर आहे. राज्यमार्गाच्या आजूबाजूला मोठी मोठी दुकाने आहेत, त्या दुकानात जाण्यासाठी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोंढा कोसरा या गावांना आजूबाजूची पंचवीस ते तीस गावे जोडली आहेत .त्यांचा संपर्क दररोज या गावाशी होत असते, पण सध्या राज्य मार्ग पूर्णपणे उखडला असून चिखलीत असल्याने नागरिकांना येथे येण्यास मोठा त्रास होत आहे. मार्गावर येथे १० ते १२ फुटाचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे आजूबाजूला चिखलयुक्त माती आहे त्यामुळे जडवाहन, चाकीवाहन, मोटारसायकल, सायकलस्वार यांना येण्या-जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक नागरिक या खड्डेयुक्त रस्त्यावर गंभीर जखमी झाले आहे. कंत्राटदार कंपनीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. मार्गावर अनेकांचे घर आहेत घरासमोर चिखलच चिखल असल्याने दुर्गंधी पसरली आहे. रोगराई वाढण्याची शक्यता आहे. कोसरा गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर नाली बांधकाम सुरू आहे. पण गावात येण्या-जाण्यासाठी योग्य मार्ग न काढल्याने वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन राज्यमार्ग खोदून ठेवला, पण ते काम न केल्याने लोकांमध्ये बांधकाम कंपनीविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
राज्यमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. कंत्राटदार खिसे गरम करीत असल्याने ते दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. कोंढा येते अर्धवट काम केले असल्याने रस्त्यावर येणे जाणे करणे कठीण जात आहे. तेव्हा या सर्व सर्व गोष्टीचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पावसाळ्यात रस्ता उखडून ठेवल्याने नागरिक त्रस्त आहेत, तेव्हा कोंढा येथील राज्यमार्गाचे काम त्वरित करावे अन्यथा येथील नागरिक जन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.