करडी परिसरातील ग्रामीण व अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:27+5:302021-07-18T04:25:27+5:30
मुख्य मार्गावरून गावात जाणाऱ्या व गावांतर्गत रस्त्यांचीही अतिशय दुरवस्था झाली आहे. मुंढरी खुर्द पोच मार्ग, मुंढरी बुज मार्च मार्ग, ...
मुख्य मार्गावरून गावात जाणाऱ्या व गावांतर्गत रस्त्यांचीही अतिशय दुरवस्था झाली आहे. मुंढरी खुर्द पोच मार्ग, मुंढरी बुज मार्च मार्ग, निलज खुर्द व निलज बुज पोचमार्ग तसेच करडी गावातील अंतर्गत रस्त्यांचे बेहाल झाले आहे. करडी गावातील सिमेंट रस्ते अपघातांस कारणीभूत ठरत आहेत. याकडे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.
पावसामुळे खड्ड्यांत आणखी भर पडली आहे. वाहनांच्या नुकसानीचे प्रमाण वाढीस लागल्याने वाहतुकीदार त्रस्त आहेत. खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालविताना कमालीची कसरत करावी लागते आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजायला मार्ग नाही. खड्डेमुक्तीची घोषणा राजकारण्यांकडून अपेक्षाभंग झाली असताना नव्या राजकारण्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खड्ड्यांमुळे रस्ते दुरुस्तीची पोलखोल झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
170721\img_20210717_111205.jpg~170721\img_20210717_110633.jpg
करडी परिसरातील ग्रामीण व अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे ( खडकी ते ढिवरवाडा रस्ता फोटो )~करडी परिसरातील ग्रामीण व अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे ( खडकी ते ढिवरवाडा रस्ता फोटो )