७२ तासांच्या शोधकार्यानंतर सापडला पीयूषचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:25 AM2017-09-02T00:25:35+5:302017-09-02T00:25:57+5:30
दोन मित्रांसमवेत सूर नदी पात्रात पोहायला गेलेल्या पियुष बडवाईक या विद्यार्थ्याचा मृतदेह आज तिसºया दिवशी सकाळी अंभोरा जवळील तिड्डी नदी पात्रात आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दोन मित्रांसमवेत सूर नदी पात्रात पोहायला गेलेल्या पियुष बडवाईक या विद्यार्थ्याचा मृतदेह आज तिसºया दिवशी सकाळी अंभोरा जवळील तिड्डी नदी पात्रात आढळून आला. ३० आॅगस्ट रोजी पीयूष व त्याचे मित्र साहिल कावळे व यश सपाटे हे तिघेही पोहायला गेले होते. ते जिजामाता महाविद्यालयात इय्यता अकरावी विज्ञान शाखेत शिकत होते.
बुधवारला सूर नदीच्या पात्रात वाहून गेल्यानंतर दुसºया दिवशीही गोसावी घाटापासून ते आंभोरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र वाहून गेल्याच्या ६० तासानंतरही त्याचा शोध लागलेला नव्हता. दरम्यान आज सकाळी शोधमोहीमेदरम्यान तिड्डी नदी पात्रातील ईकार्निया वनस्पती अडकलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनेच्या दिवशी पियुष बडवाईक, साहिल कावळे व यश सपाटे हे तिघेही मित्र शाळेत उशिरा गेले. दरम्यान, त्यांच्या शिक्षकाने शाळेत येण्यासाठी उशिर का? झाला असे तिघांनाही हटकले असता हे तिघेही तिथून कुणालाही न सांगता सायकलने थेट सूर नदीच्या गोसावी घाटावर गेले. त्यावेळी तिघेही नदीत उतरले. पोहून बाहेर येत असताना पियुष पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घाबरलेल्या या दोन मित्रांनी महाविद्यालय गाठून घडलेला सर्व प्रकार शिक्षकांना सांगितला.
तोपर्यंत पीयूष पाण्याच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत वाहून गेला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला पाठविले. या चमूने दिवसरात्र एक करून त्याचा शोध घेत राहिले. अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती.
शोधमोहिमेदरम्यान शुक्रवाला तिड्डी नदी पात्रात ईकार्निया वनस्पतीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे आणि मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे जलस्तर वाढल्यामुळे जिल्ह्यातून वाहणाºया सूर नदी व वैनगंगा नदीसह नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे शोधमोहीमेदरम्यान अडथळ्यांना सामोरे जावे लागले. पियुषचे वडील सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असून त्यांना दोन मुले आहेत. याप्रकरणाची भंडारा ग्रामीण पोलिसांनी नोंद केली आहे.