पीडितेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2017 12:22 AM2017-03-26T00:22:51+5:302017-03-26T00:22:51+5:30

लाखांदूर येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालावा ..

The plaintiff's case should be prosecuted in a fast track court | पीडितेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा

पीडितेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा

Next

मुख्यमंत्र्यांना निवेदन : आमदार सिरस्कर यांची लाखांदूरला भेट, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी केली चर्चा
भंडारा : लाखांदूर येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालावा व पीडितेसह तिच्या कुटुंबीयाला पोलीस प्रशासनाकडून संरक्षण मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली असल्याची माहिती बाळापुरचे आमदार बळीराम सिरस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली.
लाखांदूर येथील १६ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी ते आज भंडारा येथे आले होते. यावेळी विश्रामगृहात त्यांनी ही माहिती दिली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सिरस्कर यांनी पीडित मुलीची व तिच्या कुटुंबियाची लाखांदूर येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी कुटुंबियांना धीर दिला व भविष्यासाठी जिकरीने उभे राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
चंद्रमौळी झोपडीत वास्तव्य करणाऱ्या या पीडित कुटुंबाला समाजातील इतर घटकाकडून मानहानी किंवा त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या कुटुंबाला कुठल्याही पद्धतीचे संरक्षण अद्याप दिली नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार सिरस्कर यांच्या लाखांदूर भेटीदरम्यान त्यांच्यासोबत अखिल भारतीय माळी महासंघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी, कल्याण जामगडे, प्रकाश अटाळकर, बंडू बनकर, अ‍ॅड. रवीभूषण भुसारी, विजय शहारे, वृंदा गायधने, शंकर राऊत, रविंद्र खंडाळकर आदी माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांत्वना भेटीदरम्यान आमदार सिरस्कर यांनी पीडितेच्या वडिलांना शासनाकडून तात्काळ अर्थसहाय्य व सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या अत्याचार प्रकरणाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून त्यांनीही गृह तथा अन्य विभागाला या कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.
त्यानंतर भंडारा येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यात या प्रकरणात समाजबांधवांनी पीडितेच्या कुटुंबियांसोबत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाची ताकत दाखवावी असे मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची भेट घेऊन लाखांदूर प्रकरणात यथोचित सहकार्य करण्याचे सूचित केले. यावर त्यांनी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे व कुटुंबाला संरक्षण देण्याचे अभिवचन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी, माधुरी देशकर, रवी भुसारी, रामरतन मोहुर्ले, अशोक उबाळे, नेपाल चिचमलकर, अरविंद बनकर, अनिल शेंडे, ईश्वर उरकुडे, भागवत किरणापुरे, दुर्गाप्रसाद शेंडे, तेजराम नागरिकर, रमेश गोटेफोडे, भागवत मदनकर, संजय बनकर यांच्यासह माळी बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The plaintiff's case should be prosecuted in a fast track court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.