‘गोसीखुर्द’मध्ये शंभर टक्के जलसाठ्याचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:18+5:302021-06-30T04:23:18+5:30

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कक्षात गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. विदर्भ ...

Plan for 100% water storage in Gosikhurd | ‘गोसीखुर्द’मध्ये शंभर टक्के जलसाठ्याचे नियोजन करा

‘गोसीखुर्द’मध्ये शंभर टक्के जलसाठ्याचे नियोजन करा

Next

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कक्षात गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश पवार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई उपस्थित होते.

गोसीखुर्द हा महाराष्ट्रातील एकमेव ‘राष्ट्रीय सिंचन प्रकल्प’ आहे. या प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत. गोसीखुर्द प्रकल्पासाठी शिल्लक भूसंपादनाचा जिल्हानिहाय आढावा घेवून येत्या सहा महिन्यात भूसंपादनाची बहुसंख्य प्रकरणे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास लवंगारे-वर्मा यावेळी व्यक्त केला. गोसीखुर्द प्रकल्पाबाबतची प्रमुख प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोसीखुर्द धरणात सद्य:स्थितीत ५० टक्के सिंचन क्षमता निर्माण होवून ८२ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन खाजगी जलविद्युत प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतर करा’ या धोरणावर विकसित करण्यात आले आहे.

बॉक्स

चार उपसा सिंचन योजना

गोसीखुर्द धरणाची साठवण क्षमता ११४६ दशलक्ष घनमीटर आहे. तर प्रकल्पाचा पाणी वापर १५४० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. प्रकल्पाला उजवा व डावा असे दोन मुख्य कालवे आहेत. तसेच बुडीत क्षेत्रातून टेकेपार, आंभोरा, नेरला आणि मोखाबर्डी या चार उपसा सिंचन योजना आहेत. तर कालव्यावर पवनी, शेळी, अकोट, गोसी व शिवनाळा या छोट्या उपसिंचन योजना आहेत. या धरणाची उंचीवाढ व कालवे प्रणालीचा विस्तार व सुधारणा यांची कामेही प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती अंकुर देसाई यांनी यावेळी दिली.

Web Title: Plan for 100% water storage in Gosikhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.