लाखनी तालुक्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:03+5:302021-04-10T04:35:03+5:30

धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो. त्यातही ...

Plan the left canal of Gosikhurd project for Lakhni taluka | लाखनी तालुक्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन करा

लाखनी तालुक्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन करा

Next

धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो. त्यातही अनेक अडचणी येत असतात. केवळ आठ तास वीजपुरवठा केल्याने शेतीचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. वाढत्या विंधन विहिरीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. धान पिकाला लावलेली मजुरी, खत, बियाणे व इतर खर्चाचा विचार करता शेतकऱ्याला पुरेसे उत्पन्न मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. मुला-मुलींचे शिक्षण व लग्नही करू शकत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडतात, असे रणवीर भगत यांनी निवेदनातून सांगितले आहे. लाखनी तालुक्यातील गडेगाव, गोंडसावरी, सावरी, मुरमाडी (सावरी), लाखनी, लाखोरी, सालेभाटा, केसलवाडा (पवार), मोरगाव, पिंपळगाव (सडक) साझ्यातील ३२ गावांना ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती क्षेत्र नवीन कॅनॉलद्वारे सिंचन करता येणार आहे. साकोली तालुक्यातील ८हजार ३२० हेक्टर आर शेती क्षेत्रातील १७ गावांना नवीन कॅनॉलचा लाभ होऊ शकतो, असे निवेदनात भगत यांनी स्पष्ट केले आहे.

तलावात नहराचे पाणी सोडल्यास शेतीला पाणीपुरवठा करता येईल. लाखनी व साकोली तालुक्यातील किन्ही, गडेगाव, रेंगेपार (कोठा), खुर्सिपार, लाखोरी, निलागोंदी, सालेभाटा, चिखलाबोडी, एकोडी, बाम्पेवाडा, उसगाव, चांदोरी, पिंडकेपार, घानोड येथील मोठ्या जलाशयात गोसेखुर्द नहराचे व उपसा सिंचनाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल.

Web Title: Plan the left canal of Gosikhurd project for Lakhni taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.