योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे

By Admin | Published: February 18, 2017 12:28 AM2017-02-18T00:28:41+5:302017-02-18T00:28:41+5:30

केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

The plans must reach the public | योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे

योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे

googlenewsNext

नाना पटोले : शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ
पवनी : केंद्र शासनाच्या अनेक योजना आल्या असून या योजना सर्व जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील पातळीवर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविल्या जावेत तसेच योजना जनतेच्या दारी पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. गुरूवारी पवनी येथे झालेल्या जनता दरबारात ते बोलत होते.
पटोले म्हणाले, या योजनाचा लाभ सर्व गोरगरीब जनतेला व गरजूंना झालाच पाहिजे. याकरिता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. त्याच्याकडे दिलेली जबाबदारी अथवा शासकीय व जनतेची कामे करण्यास कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना देखील माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या योजना या प्रत्येक घरापर्यंत पोहचल्याच पाहिजे. लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून काम केले पाहिजे. शासनाच्या योजना आपल्या दारी आल्या आहेत. या योजना धावल्या पाहिजेत तरच आपला विकास होईल. सात दिवसाच्या आत सर्व प्रकरणाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी करावा अन्यथा त्यांना कार्यवाहीस पुढे जावे लागेल. यानंतर लोकांना सतरावेळा हेलपट्या खावे लागणार नाही, असेही त्यांनी बजावून सांगितले. प्रास्ताविक तहसिलदार वासनिक यांन केले. जनता दरबारात १५० चे वर प्रकरणे वा तक्रारी जनतेकडून आल्यात यात सर्वात अधिक प्रकरणे महसूल विभागाशी व गोसे धरणाशी संबंधीत आहेत. गोसे धरणामुळे निर्माण झालेल्या समस्या, पुर्नवसन, जमिनीचा मोबदला, फेरफार तसेच जमिनीचा सातबारा संबंधी व घरकुलासंबंधीच्या सर्व समस्यांचे निवारण खासदार नाना पटोले यांनी केले. दुपारी १.३० वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी ६.३० वाजता समाप्त झाला. एकूण १५ शासकीय विभागाचा यात सहभाग होता. सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिलीत व ते सोडविण्याचे आश्वासन देखील दिलीत. यावेळी मंचावर आमदार अ‍ॅड. अवसरे पवनीच्या नगराध्यक्षा पुनम काटेखाये, भाजपा तालुका अध्यक्ष के.डी. मोटघरे, संदीप शेटीवार, ठाणेदार मधुकर गिते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पी.पी. गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार शुशांक कांबळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The plans must reach the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.