झाडीपट्टीचा नायक-खलनायक रविंद्र ठवकर
By admin | Published: September 22, 2015 01:04 AM2015-09-22T01:04:00+5:302015-09-22T01:04:00+5:30
गणेशोत्सव, दिवाळी, नववर्षाच्या पर्वावर हौसेखातर सर्वोदय नाट्यमंडळाच्या रंगभूमीवर नाटके सादरीकरण करणारा पालोरा येथील
युवराज गोमासे ल्ल करडी (पालोरा)
गणेशोत्सव, दिवाळी, नववर्षाच्या पर्वावर हौसेखातर सर्वोदय नाट्यमंडळाच्या रंगभूमीवर नाटके सादरीकरण करणारा पालोरा येथील रविंद्र ठवकर यांचे नाव नाट्यक्षेत्रात आज झाडीपट्टीचा नायक म्हणून आदराने घेतले जाते. ३० वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चढ उतार त्यांनी अनुभवले. गरीबीमुळे पोटापाण्यासाठी अनेक व्यवसायांचे उपद्व्याप सुरु केल्यानंतरही त्यांची नाटकांची ओढ कमी झाली नाही. सशक्त अभिनय, दमदार संवाद व उत्कृष्ट देहबोलीच्या भरवशावर नाट्यरसिकांची दाद मिळविली. अनेक पुरस्कार व पारितोषिकांचे ते मानकरी ठरले आहेत.
पालोरा येथील सर्वोदय नाट्य मंडळाच्या रंगभूमीवर तयार झालेल्या रविंद्र तुळशीराम ठवकर या ४७ वर्षीय नाट्य कलावंताचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले. घरी दोन एकर जमीन, दोन भाऊ, प्रपंचाचा गाडा निट चालावा म्हणून सुरुवातीला मजुरी, देव्हाडा वैनगंगा साखर कारखान्यात पहारेदाराची नोकरी केली. कारखाना बंद झाल्यानंतर टेलरिंग व दुधाचा व्यवसाय आज ते सांभाळत आहेत.
सन १९७२ मध्ये ‘बोवा तिथे बाया’ या नाटकात त्यांनी बालकलाकाराची भूमिका वठविली. नाटकातील गंध वाढत गेला. तरुण वयातील ‘फकीरा’ ही पहिली नाटक गाजली. अन् नायक म्हणून त्यांचा उदय झाला. त्यानंतर सर्व नाटकात खलनायक व नायकाचीच भूमिका त्यांना मिळाली.
त्यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये यळकोट मल्हार, मराठा गडी - यशाचा धनी, ईथ ओसाळला मृत्यू, संभा बेलदार, भीक, भाकर, भूक, रुसली साडी माहेरची, खंडोबाची आण, सिंहाचा छावा, काकाचा अघोरी कावा, तो मी नव्हेच आदी व अन्य नाटकांचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी २५१ नाटके खेळली. खलनायकाचीही पात्रे रंगविली. व्यावसायीक रंगभूमीत सन १९९६ मध्ये प्रवेश झाला. ‘सासू नंबरी-सून दस नंबरी’ ही त्यांची पहिली व्यावसायीक नाटक प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने गाजविली. पसंतीस उतरली, भंडारा जिल्ह्यात नाव झाला.
सरगम नाट्य रंगभूमीमुळे आघाडीचा नाट्यकलावंत म्हणून ओळख मिळाली.
भंडारा सरगम रंगभूमी व कामगार कल्याण मंडळ तुमसर यांचेमुळे नागपूर विभागीय स्तरावर अनेक नाटके खेळता आली, असे ठवकर आदराने सांगतात.
पारितोषिके प्रोत्साहन व चालना
४पालोरा सारख्या दुर्गम खेड्यातून समोर आलेल्या रविंद्र ठवकर यांनी सरगम नाट्य रंगभूमी व सर्वस्तरीय कलाकार परिषदेची स्थापना होण्यासाठी मोलाची मदत केली, ते संस्थापक सदस्य आहेत. नवनवीन कलाकारांना चालना देणे, मंच मिळवून देण्यासोबत प्रशिक्षणाचे काम पार पाडल्या जात आहेत. समाजकल्याण विभागाद्वारे संचालित कामगार कल्याण मंडळाद्वारे खेळल्या गेलेल्या ‘मनधुंवाधार’ या नाटकासाठी कामगार कल्याण मंडळाचा पुरस्कार मिळाला. कलाकार परिषदेतर्फेही उत्कृष्ट कलाकार म्हणून अनेकदा सन्मानित करण्यात आले.
खेड्यातील कलावंतांना संदेश
४गाव, खेड्यातील नाट्य कलावंतांनी मेहनत केली पाहिजे. मार्गदर्शनातून मनुष्य पुढे जातो. कलेची सर्वत्र प्रसंशा होते. झाडीपट्टीतील कलावंतांनी गावातील स्टेजवर अवलंबून न राहता व्यवसायीक रंगभूमीकडे वळावे किंवा हौशी रंगभूमीला तरी जोपासले पाहिजे. कला प्रत्येकाच्या अंगी असून ती योग्य स्तरावर प्रदर्शीत झाली पाहिजे, असा संदेश रविंद्र ठवकर यांचा आहे.