सामाजिक बांधिलकी जोपासून एक तरी झाड लावा

By admin | Published: June 23, 2016 12:24 AM2016-06-23T00:24:46+5:302016-06-23T00:24:46+5:30

पर्यावरणाच्या रक्षणाकरिता वृक्ष लागवड करणे काळाची गरज असून प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प करावा. वृक्ष लागवड केली का

Plant a tree from social commitment | सामाजिक बांधिलकी जोपासून एक तरी झाड लावा

सामाजिक बांधिलकी जोपासून एक तरी झाड लावा

Next

अनिल सोले : भंडारा, तुमसर, साकोली, लाखांदुरात वृक्षदिंडी यात्रा
साकोली/ लाखांदूर/ तुमसर/ भंडारा : पर्यावरणाच्या रक्षणाकरिता वृक्ष लागवड करणे काळाची गरज असून प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प करावा. वृक्ष लागवड केली का? याचा आढावा घेण्यात येणार आहे. राज्य शासनाला तसा अहवाल सादर करावा लागणार आहे. केवळ कागदोपत्री वृक्ष लागवडीला यामुळे लगाम लागणार आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासून एक नागरिक एक झाड लागवड करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आमदार अनिल सोले यांनी तुमसरात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
२० ते ३० जूनपर्यंत १० दिवस नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात वृक्ष लागवड व संवर्धनाकरिता जनजागृती करून वृक्ष रोपण्याचा संकल्पाकरिता वृक्ष दिंडी यात्रा काढण्यात आली. वनविभाग, सामाजिक वनीकरण व इतर स्वयंसेवी संस्था यात सहभागी तर होत आहेत. परंतु जनतेचा सहभाग गरजेचा आहे. वृक्षदिंडीची सुरुवात रामटेकपासून करण्यात आली. २८ जून रोजी हिंगणा येथे वृक्षदिंडीचा समारोप होणार आहे. प्रत्येकाकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहे.
या चळवळीला यश मिळावे याकरता जनतेचा सहभाग आवश्यक आहे. १ जुलै रोजी अक्षांश, रेखांश पाडून किती वृक्ष लागवड केली हे पाहण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला आ.चरण वाघमारे, मो.तारिक कुरैशी, प्रदीप पडोळे, संतोष वैद्य तथा पदाधिकारी उपस्थित होते. नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. माकडे, लेंडेझरीचे वनपरिेक्षत्राधिकारी एस.यु. मडावी, अरविंद जोशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
लाखांदुरात वृक्षदिंडी
नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वाधिक ठेवा भंडारा जिल्ह्यात आहे. मानवाच्या दैनंदीन गरजा या नैसर्गिक साधन संपत्तीवरच अवलंबून आहे. जंगलावर महत्त्वाच्या गरजा निर्भर असल्याने भावी पिढीकरिता नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे महत्त्वाचे असून नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास थांबविण्याचे आवाहन आ.सोले यांनी केले.
राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीची जनजागृतीसाठी ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने पूर्व विदर्भात वृक्षदिंडी काढली आहे. ही रॅली बुधवारला साकोली, लाखांदूर येथे पोहोचली. लाखांदूर येथील शिवाजी चौकात दोन कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश काशिवार. नगराध्यक्ष निलीमा हुमणे, पंचायत समिती उपसभापती मंगला बगमारे, न.प.उपाध्यक्ष नरेश खरकाटे, सदस्य विनोद ठाकरे, वनपरिक्षेत्राधीकारी आर. एस. दोनोडे, हरिश बगमारे, वनिता मिसार, दिव्या राऊत, संगिता गुरनुले, भारती दिवटे, देवानंद नागमोती, क्षेत्र सहायक जांगडे, वनरक्षक के. टी. बगमारे, एस. जी. जाधव, एम. एस. मंदनवार, बी. एस. मंदनवार, ए. जे. वासनीक, एफ. एच. सय्यद, मुकेश भैया, गोसु कुंभरे उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, शुद्ध हवा, पाणी दैनंदिन जिवनात गरजेचे आहे. नैसर्गिक साधन संपत्ती या जंगलात सर्वाधिक आहे. त्यामुळे वृक्षतोड थांबवा, जास्तीत जात वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी मदत होईल, त्याचा फायदा पुढच्या पिढीला होईल. राज्य शासनाचा १ जुलैला होणारा २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम लाखांदूर वनविभागाने शंभर टक्के यशस्वी करण्याच्या उद्देशाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
प्रत्येकाने पालकत्व स्वीकारावे - काशीवार
साकोली : दिवसेंदिवस जंगलाची संख्या कमी होत आहे. त्याचे विपरित परिणाम आपनालाच भोगावे लागत आहे. त्यामुळे जंगलाची संख्या वाढविणे काळाची गरज ठरली आहे. वनविभागाच्या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रात ४४ कोटी वृक्षलागवट करावयाची आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणानंतर त्या वृक्षाची पालकत्व स्विकारून ते झाड जगवायचे आहे, असे मत आ. बाळा काशीवार यांनी सेंदुरवाफा येथे वृक्षदिंडीचे स्वागत व आायोजित सभेत केले. यावेळी तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, दिपक मेंढे, उपसभापती लखन बर्वे, शंकर राऊत, सरपंच वसंता तुमडाम, पं.स. सदस्य धनंजय राऊत, जयश्री पर्वते, रेखा बोरकर, बंडू बोरकर, रूपेश खेडीकर, उपसरपंच अनिक निंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जि.प. सदस्य नेपाल रंगारी यांनी तर आभारप्रदर्शन हुसेन कापगते यांनी मानले.
वृक्षदिंडीचे भाजपतर्फे शहरात स्वागत
भंडारा : भारतीय जनता पक्षातर्फे वृक्षारोपण अभियानात लोकसहभाग वाढविण्याचा उद्देशाने जनजागृतीसाठी रामटेक येथून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीचे २० जूनला भंडारा शहरात आगमन झाले. यावेळी नागपूर नाक्याजवळ भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, प्रकाश मालगावे, सुनील मेंढे, चंद्रशेखर रोकडे या उपस्थितीत वृक्षदिंडीचे स्वागत करण्यात आले. आ. अनिल सोले यांच्या नेतृत्वात निघालेली वृक्षदिंडी गांधी चौकात पोहचताच राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड अभियानाची माहिती देण्यात आली. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी वृक्षारोपण अभियानात नागरिकांनी आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री प्रदीप पडोळे, जिल्हासचिव विकास मदनकर, जि.प. सदस्य सुभाष आजबले, सुर्यकांत ईलमे, संजय मते, संजय कुंभलकर, अरुण भेदे, सतीश सार्वे, आशू गोंडाणे, पप्पू भोपे, मधुरा मदनकर, आशा उईके, रोशनी पडोळे, संध्या त्रिवेदी, नितीन धकाते, भुनेश्वर जांभुळकर, जयंता बोटकुले, कुमार आकरे, अमित मेहर, निखील तिरपुडे, अमित बिसने, मिलिंद मदनकर, नितीन नागदेवे, संजय बांडेबुचे, बंटी अग्रवाल यांच्यासह भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Plant a tree from social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.