झाडांचे शतकअंतर्गत धानोरी येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:34+5:302021-08-19T04:38:34+5:30
ती संकल्पना धानोरी ग्रामवासीयांनी प्रत्यक्षात राबविली. गावातील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना व त्यांच्या नातवंडांना सोबत घेऊन ग्रामपंचायत ...
ती संकल्पना धानोरी ग्रामवासीयांनी प्रत्यक्षात राबविली. गावातील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना व त्यांच्या नातवंडांना सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालय ते बसथांबापर्यंत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा व घराशेजारी उपलब्ध जागेवर आजोबांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांच्या नातवंडांना वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली.
७५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांत शामराव पारधी, फकिरा मांढरे, उत्तम शेंडे, देवाजी नान्हे, सुधाकर खडकाळ, मैनाबाई सतिबावने यांचा समावेश होता. वृक्षदिंडी व वृक्षारोपण यावेळी सरपंच गीता मंडपे, माजी मुख्याध्यापक अशोक पारधी, उपसरपंच शीला ठाकूर व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक तलमले, फ्लायकॅचर वाइल्ड फ्रेंडस् पवनीचे पंकज देशमुख, संदीप समर्थ, अभिग्यान फाउंडेशनचे प्रतीक लेपसे, अमित पारधी, नीलिमा लेपसे व अन्य सदस्य, तसेच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा धानोरी येथील मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग, भोजापूर येथील भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
160821\5035_dsc9121.jpg
झाडांचे शतक अंतर्गत धानोरी येथे वृक्ष दिंडी व वृक्षारोपण.