सहानगड किल्ल्यावर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:42 AM2021-09-09T04:42:40+5:302021-09-09T04:42:40+5:30
साकोली : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सानगडीजवळील सहानगड किल्ल्यावर ग्रामपंचायत कमेटीने विविध वृक्ष लावून ऐतिहासिक गडकिल्ले सुशोभीकरणाचा ध्यास ...
साकोली : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सानगडीजवळील सहानगड किल्ल्यावर ग्रामपंचायत कमेटीने विविध वृक्ष लावून ऐतिहासिक गडकिल्ले सुशोभीकरणाचा ध्यास घेतला आहे. मागेही येथे टाइल्स (गट्टू) लावल्याने सहानगड किल्ल्यावर आता पर्यटकांची रेलचेल दिसून येत आहे. सानगडीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सहानगड किल्ल्यावर आजही प्राचीन बुलंद तोफ अस्तित्वात आहे. या परिसरात आता सुशोभीकरणाचा ध्यास ग्रामपंचायत कमिटीने घेतला असून, माजी सरपंच चतुर्भूज भानारकर यांनी मागे टाइल्स गट्टू लावून सौंदर्यीकरणाचा श्रीगणेशा केला होता व आता येथे नारळ, पाम, विद्या अशा मनमोहक झाडांची वृक्षलागवड करण्यात आली व हा ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा परिसर सुशोभीकरणामुळे पर्यटन क्षेत्राला वाव मिळणार आहे, हे विशेष. या अभिनव उपक्रमात सरपंच वैशाली कंगाले, उपसरपंच चतुर्भूज भानारकर, ग्रामसेवक टी.एम. कोरे, सदस्य सुरेश मेश्राम, रिता बोकडे, खेमलता कान्हेकर, अजय निपाने, गिरीश फरांडे, नरेश शहारे, हेमराज धकाते, प्रकाश शहारे, राहुल नकरे, ग्रा.पं. कर्मचारीवृंद कुलदीप धकाते, सतीश खंडाईत, रोशन खंडाईत, मिलिंद रंगारी व सर्व ग्रामवासी सहानगड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.