पालांदूर येथील स्मशानभूमीत मोठ्या २५ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:41 AM2021-08-20T04:41:14+5:302021-08-20T04:41:14+5:30

पालांदूर येथे सुमारे एक ते दोन एकर जागेत स्मशानभूमी विस्तारली आहे. बैठकीसाठी दोन सभागृह आहेत. परंतु परिसरात शोभिवंत ...

Planting of 25 big trees in the cemetery at Palandur | पालांदूर येथील स्मशानभूमीत मोठ्या २५ वृक्षांची लागवड

पालांदूर येथील स्मशानभूमीत मोठ्या २५ वृक्षांची लागवड

Next

पालांदूर येथे सुमारे एक ते दोन एकर जागेत स्मशानभूमी विस्तारली आहे. बैठकीसाठी दोन सभागृह आहेत. परंतु परिसरात शोभिवंत अथवा सावलीसाठी वृक्ष नसल्याने भकासपणा वाटतो. अंत्यविधीवेळी किमान एक तास तरी आप्तेष्टांना थांबावे लागते. उन्हाळ्याच्या वेळेस सावलीची नितांत गरज असते. त्यावेळी वृक्षाची आठवण प्रत्येकाच्या मनात येते. ही आठवण कृतीत उतरवत पालांदूर येथील माजी सरपंच कृष्णाजी धकाते यांनी दूरदृष्टी आखत स्वतःच्या खर्चातून २५ मोठ्या वृक्षांची लागवड केली. यात वड, पिंपळ, करंजी, निम आदी वृक्षांचा समावेश आहे. प्रत्येक झाडाला स्वतंत्र मजबूत लोखंडी कठडासुद्धा खरेदी करून आणलेला आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीत वृक्षांची लागवड गावच्या मान्यवर लोकांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच पंकज रामटेके, उपसरपंच हेमराज कापसे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे, डॉ. अभय पालांदूरकर, डॉ. बी. के. सिंह, उद्योगपती इद्रिस लद्धानी, कोठीराम भुसारी, तुकडोजी खंडाईत, माजी सरपंच माणिकराव हुमे गुरढा, ग्रामपंचायतीचे लिपिक राधेश्याम पाथरे उपस्थित होते.

Web Title: Planting of 25 big trees in the cemetery at Palandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.