झाडे लावा-झाडे जगवा नव्हे, झाडे वाळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:11 PM2019-04-12T22:11:12+5:302019-04-12T22:11:26+5:30

एप्रिल महिन्यात आग ओकू लागला. केवळ माणसांनाच उन्हाचा त्रास होतो, असे नाही. झाडांनाही पुरेसे पाणी दिले नाही तर उन्हामुळे वृक्षही कोमेजतात. तुमसर नगरपरिषदेने चार वर्षापुर्वी भंडारा मार्गावर सिमेंट कुंडीमध्ये फुलझाडे लावली. मात्र आता पाण्याअभावी ही झाडे आता अखेरच्या घटका मोजत आहे.

Plants are not trees, trees dry up | झाडे लावा-झाडे जगवा नव्हे, झाडे वाळवा

झाडे लावा-झाडे जगवा नव्हे, झाडे वाळवा

googlenewsNext
ठळक मुद्देतुमसरमधील प्रकार : भंडारा मार्गावरील वृक्ष मोजत आहेत अखेरची घटका

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एप्रिल महिन्यात आग ओकू लागला. केवळ माणसांनाच उन्हाचा त्रास होतो, असे नाही. झाडांनाही पुरेसे पाणी दिले नाही तर उन्हामुळे वृक्षही कोमेजतात. तुमसर नगरपरिषदेने चार वर्षापुर्वी भंडारा मार्गावर सिमेंट कुंडीमध्ये फुलझाडे लावली. मात्र आता पाण्याअभावी ही झाडे आता अखेरच्या घटका मोजत आहे. झाडे लावा, झाडे वाढवा नव्हे तर झाडे वाळवा, असाच प्रकार सध्या तुमसर शहरात दिसत आहे.
भंडारा रोडवर दुपदरीकरणाचा रस्ता आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक असून या दुभाजकावर सिमेंट कुंडीत विविध प्रकारचे फुलझाडे लावण्यात आली आहे. लहान देखनी व टवटवीत झाडे नगरपरिषदेने तीन ते चार वर्षापुर्वी लावली होती. सध्या या झाडांचा आकार वाढला आहे. एप्रिल महिन्यात भर उन्हात ही झाडे कोमेजलेली दिसत आहे. सिमेंट कुंडीतील मातीही कोरडी पडली आहे. झाडांची पाने पुर्णत: गळून पडली आहेत, काही झाडे तर वाळण्याच्या मार्गावर आहे.
नगर परिषद प्रशासनाने किमान दिवसातून एकदा या झाडांना पाणी देण्याची गरज आहे. हजारो रूपये यावर खर्च झाले. परंतु आता या झाडांना पाणीच दिले जात नाही. पाणी दिले नाही तर ही झाडे कशी वाचतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या प्रशासन लोकसभा निवडणुकीत गुंतले आहे. निवडणूक संपून आता दोन दिवस लोटले तरी या प्रकाराकडे नगरपरिषदेचे लक्ष नाही.
सध्या तापमान ४२ अंशापर्यंत पोहचले आहे. अशा परिस्थितीत ही झाडे पाण्याअभावी वाळत आहे. मातीतील पोषक द्रव्य कमी होत आहे. शेणखत, गांढूळखत आदी देणे गरजेचे आहे. परंतु सध्यातरी नगरपरिषद प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार न६ाी.
संवेदनशील मन हळहळतेय
तुमसर शहराच्या प्रमुख मार्गावर कुंडीमध्ये असलेली ही झाडे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेते. टपोर फुलांनी हे वृक्ष बहरले की मन प्रसंन्न होते. मंद सुगंधही दरवळत असतो. परंतु आता या वृक्षांची अवस्था पाहून रस्त्याने जाणारे संवेदनशील मनाचे व्यक्ती हळहळताना दिसत आहे.

Web Title: Plants are not trees, trees dry up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.