प्लाझ्मा डोनरचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 05:00 AM2020-12-31T05:00:00+5:302020-12-31T05:00:58+5:30

जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, मुख्याधिकारी विनोद जाधव, डॉ. हरिश वरभे यावेळी उपस्थित होते. कायदा व सुवस्था तसेच सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस दलातील ५१ पोलिसांनी या शिबिरात प्लाझ्मा दान केला. या कार्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.

Plasma Donor Honor | प्लाझ्मा डोनरचा सन्मान

प्लाझ्मा डोनरचा सन्मान

Next
ठळक मुद्दे१०१ प्लाझ्मा सामान्य रुग्णालयाला सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन भंडारा येथे करण्यात आले होते. या शिबिरात १०१ व्यक्तींनी प्लाझ्मा दान करुन विक्रम केला. या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या यंत्रणांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात लाईफ लाईन रक्त पेढी नागपूरच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, मुख्याधिकारी विनोद जाधव, डॉ. हरिश वरभे यावेळी उपस्थित होते. कायदा व सुवस्था तसेच सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस दलातील ५१ पोलिसांनी या शिबिरात प्लाझ्मा दान केला. या कार्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.  नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान केला. यासाठी मुख्याधिकारी विनोद जाधव यांचा स्मृतीचिन्ह देऊन प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदमधिल अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करुन सामाजिक भान जपले. यासाठी सर्वांच्यावतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे यांनी स्मृतीचिन्ह स्विकारले. उपजिल्हाधिकारी अर्चना-पोळ यादव, पोलीस निरीक्षक सचिन मेश्राम व प्रमोद डोंगरे यांनी या शिबिरासाठी योगदानाबद्दल त्यांचाही स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.

Web Title: Plasma Donor Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.