धान उत्पादक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

By admin | Published: November 4, 2016 01:02 AM2016-11-04T01:02:05+5:302016-11-04T01:02:05+5:30

आर्थिक अडचणीत सापडलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, साकोली, लाखनी, पवनी, भंडारा, तुमसर व मोहाडी

Please forgive the debt of the farming farmers | धान उत्पादक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

धान उत्पादक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

Next

शेतकरी आर्थिक अडचणीत : उपाययोजनेची गरज, संध्या गभने यांची मागणी
भंडारा : आर्थिक अडचणीत सापडलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, साकोली, लाखनी, पवनी, भंडारा, तुमसर व मोहाडी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवाचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करून तमाम शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महिला एकता मंचच्या जिल्हा अध्यक्षा तथा मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या गभने यांनी केली आहे.
मागील दोन तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पउत आहे तसेच धानपिक वातावरण बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पिक उत्पादनात घट येत आहे.
शेतीच्या मशागतीपासून तर रोवणी, निंदण, खत, किड किटकनाशक औषधी, कापणी, बांधणी व मळणी अशा विविध स्तरावर उत्पादनापेक्षा जास्त खर्च येत असतो. तसेच शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेल्या धानपिकाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शेती परवडेनाशी झाली आहे.
एकेकाळी नफ्याची असलेली शेती आता तोट्यात जात असल्यामुळे बरेच शेतकरी बटई किंवा भाडे तत्वावर शेती देत आहेत. शेतीत राबराब राबून कोणताही विकास होत नसल्याने काही शेतकरी शेती व्यवसाय सोडून शहरात कामाच्या शोधासाठी गेलेले आहेत. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते.
तरीपण शेतकरी बांधव कर्जाच्या संकटातून बाहेर पडले नसून पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्यूवाहातून बाहेर काढण्यासाठी एक विशेष बाब म्हणून केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून व सम्यक विचार करून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, लाखनी, तुमसर व मोहाडी या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवाचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर, महिला एकता मंचच्या जिल्हा अध्यक्ष संध्या गभने यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Please forgive the debt of the farming farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.