महामार्गावरील बसस्थानकाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:16 AM2017-09-02T00:16:38+5:302017-09-02T00:17:08+5:30
खरबी नाका ते भंडारा शहर सिमेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील असलेले बसस्थानक शोभेची वस्तु बनलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : खरबी नाका ते भंडारा शहर सिमेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील असलेले बसस्थानक शोभेची वस्तु बनलेली आहे. काही ठिकाणी बसस्थानक नाहीसे झालेली आहे तर काही बसस्थानकामध्ये झाडीझुडूपे वाढलेली आहे.
खरबी नाका येथील बसस्थानक गावाबाहेर बांधले. या बसस्थानकाचा वापर रात्री अपरात्री अवैध व्यवसाईक करीत असल्याचे उघड झाले आहे. चिखली फाटा टि पार्इंट चौक येथे भर उन्हात व पावसात प्रवाशी बसची प्रतिक्षा करीत रस्त्यावर उभे राहतात. याठिकाणी बसस्थानक नाही. शहापूर येथे भंडाºयाहून नागपूरकडे जाण्यासाठी प्रवाशी शाळकरी, आठवडी बाजार करणारे शेतकरी व्यापारी यांच्याकरिता बसस्थानक नाही. ठाणा पेट्रोलपंप हे अत्यंत महत्त्वाचे व वर्दळीचे ठिकाण असून येथे केवळ पाच दहा प्रवासी उभे राहतील एवढे तयार करण्यात आले आहे. येथे दिवसा काठीला खासगी व लक्झरी जलद, साधारण असे सुमारे दिडशे बसेसचा थांबा आहे. दर दहा मिनिटाला २५-३० प्रवासी ये-जा करीत असतात. लगत आयुध निर्माणी येथे ये-जा करणारे विदेशी व्हिजीटर, राज्य सचिव दर्जाचे अधिकारी या बसस्थानकाचा वापर करतात. येथे शौचालयाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. काही ठिकाणी बसस्थानक आहे पण शेड नसल्याने प्रवाशांना ऊन पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे.