गांधी सागर उद्यानाची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:20+5:302021-01-04T04:29:20+5:30
सहा वर्षांपूर्वी लाखोंचा निधी खर्चून गांधी सागर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. राज्य आणि जिल्हा पातळीवर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक ...
सहा वर्षांपूर्वी लाखोंचा निधी खर्चून गांधी सागर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. राज्य आणि जिल्हा पातळीवर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक झाले होते. परंतु, आता नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची दैनावस्था झाली आहे. सध्या उद्यानाची स्थिती अत्यंत बकाल झाली आहे. चोहीकडे रानगवत उगवलेले आहे. महागडी झाडे नष्ट झाली. सर्वत्र घाण व कचरा पसरल्याचे दिसून येते. उद्यानाच्या बांधकामावर सुरुवातीला एक कोटीपेक्षा अधिक खर्च झाले. चार वर्षांपूर्वी उद्यान शहरवासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. मुले, वृद्ध येथे फिरण्यासाठी आणि मनोरंजनासाठी यायचे. परंतु, सध्या या उद्यानाची दुरवस्था झाल्याचे दिसते. नगरपालिकेने या उद्यानाचे सौंदर्यकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट
गांधी सागर उद्यान दुरुस्तीचे काम कोरोना संकटकाळात बंद करण्यात आले होते. मात्र आता स्थिती पूर्ववत होत असल्यामुळे दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सदर कामाला एक महिन्याचा कालावधी लागणार असून नागरिकांसाठी उद्यान पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
वीरेंद्र ढोके, अभियंता, आरोग्य व स्वच्छता विभाग, नगर परिषद, तुमसर