धान्य दुकानात लागणार ‘पॉर्इंट आॅफ सेल’ उपकरण

By admin | Published: May 8, 2016 12:27 AM2016-05-08T00:27:20+5:302016-05-08T00:27:20+5:30

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्णत: संगणकीकरण करण्यात येत असून त्याअंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून...

'Point of Sale' device to be used in the grain store | धान्य दुकानात लागणार ‘पॉर्इंट आॅफ सेल’ उपकरण

धान्य दुकानात लागणार ‘पॉर्इंट आॅफ सेल’ उपकरण

Next

भंडारा : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्णत: संगणकीकरण करण्यात येत असून त्याअंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप करण्यासाठी ‘पॉर्इंट आॅफ सेल’ हे उपकरण लागणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी तिचे संपूर्ण संगणकीकरण करण्यासाठी यापूर्वीच मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत दोन टप्प्यात कार्यवाही करण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय अन्न महामंडळाच्या गोदामापासून राज्य शासनाच्या गोदामापर्यंत सर्व टप्प्याचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व रास्त भाव दुकानातील व्यवहाराचे संगणकीकृत व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या १०३ कोटी ९९ लाख रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात रास्त भाव दुकानात लाभार्थ्यांची आधार क्रमांकाशी संलग्नित बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यासाठी मोबाईल टर्मिनल तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तयार करणाऱ्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मोबाईल टर्मिनल तंत्रज्ञानाऐवजी पाँइट आॅफ सेल हे उपकरण अधिक योग्य असल्याने त्याच्या वापराची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यातील ५१ हजार ७२५ रास्तभाव दुकानांमध्ये हे उपकरण बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासन प्रति क्विंटल ८.५० रूपये याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देणार आहे. त्यातून या प्रकल्पाचा खर्च भागविण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'Point of Sale' device to be used in the grain store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.