चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 10:50 PM2022-03-08T22:50:15+5:302022-03-08T22:51:40+5:30
Bhandara News चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता तालुक्यातील मोहरणा येथे उघडकीस आली.
भंडारा: चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता तालुक्यातील मोहरणा येथे उघडकीस आली.
प्राची भोजराज चौधरी (५), हिनल विनोद रासेकर (५) व भैवी विनोद रासेकर (२) तिघेही रा. मोहरणा असे विषबाधा झालेल्या बालकांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी ही मुले घरालगतच्या परीसरात खेळत होते. यावेळी परीसरातीलच चंद्रज्योतीच्या झाडाच्या वाळलेल्या बिया त्यांनी खाल्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. बालकांना विचारले असता त्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याचे सांगितले.
त्यांना तात्काळ कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांना रात्री ९ वाजता लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिन्ही बालकांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार लांजेवार यांनी दिली आहे.