ईटान रेती घाटावरून पोकलँडने रेतीची वाहतूक
By admin | Published: March 7, 2017 12:29 AM2017-03-07T00:29:20+5:302017-03-07T00:29:20+5:30
तालुक्यातील ईटान येथील रेती घाटाचे डिसेंबर २०१६ लिलाव झाले आहे. सद्यस्थितीत या रेतीघाटावर पोकलँडने रेतीचा उपसा करून क्षमतेपेक्षा रेतीचे जास्त उत्खनन सुरू आहे.
प्रशासन अनभिज्ञ : क्षमतेपेक्षा रेतीचे अधिक खनन
लाखांदूर : तालुक्यातील ईटान येथील रेती घाटाचे डिसेंबर २०१६ लिलाव झाले आहे. सद्यस्थितीत या रेतीघाटावर पोकलँडने रेतीचा उपसा करून क्षमतेपेक्षा रेतीचे जास्त उत्खनन सुरू आहे.
संबंधीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ हेक्टर क्षेत्रातील ३ मीटर खोल रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. १.८५ कोटी रूपयाला या घाटाचे लिलाव झाले आहे. मात्र सदर ठेकेदार नियमांना धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा रेतीचे जास्त उत्खनन करीत आहे. परवान्यानुसार ३ मीटर खोलीतुन रेतीचा उपसा करायचा आहे. पण ईटान रेती घाटावर मीटरहून अधिक खोलीतुन रेती उपसा करण्यात येत आहे. पाणी साचल्यानंतर इंजिन पंपाद्वारे पाणी काढल्या जात आहे.
या घाटावर पाहणीकरीता गेले असता, पोकलँन्डने उपसा करीत असल्याचे दिसून आले. या रेती घाटावरील कर्मचाऱ्याला रेती उपसा करावयाच्या क्षेत्राबाबत विचारले असता त्यांनी १५ हेक्टर सांगितले. तलाठी वाडे यांना विचारले असता त्यांनी ६ हेक्टर सांगितले. मात्र ६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातून रेतीचा उपसा होत आहे.
दिवसा व रात्रीसुद्धा या घाटावरून रेतीचा उपसा केला जात असतो. क्षमतेपेक्षा अधिक रेती उपसा होत असल्याने शासनाचा तिजोरीला चुना लागुन, लाखो रूपयाचा महसुल डुबत आहे. संबंधीत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या घाटावरून रेतीचा अतिरीक्त होत असलेला उपसा थांबविण्यात यावा अशी मागणी ईटानवासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)