नदीपात्रात पोकलँडने इंटकवेल

By admin | Published: March 28, 2017 12:14 AM2017-03-28T00:14:17+5:302017-03-28T00:14:17+5:30

शहराला पाणीपुरवठा करणारी जीवनदायीनी वैनगंगेचा प्रवाह बंद पडला

Pokland intends to navigate in the river bed | नदीपात्रात पोकलँडने इंटकवेल

नदीपात्रात पोकलँडने इंटकवेल

Next

प्रवाह बंदमुळे पाणी टंचाई : तुमसर नगरपरिषदेचा पुढाकार
तुमसर : शहराला पाणीपुरवठा करणारी जीवनदायीनी वैनगंगेचा प्रवाह बंद पडला .तुमसर नगरपरिषद प्रशासनाने माडगी (दे) येथील नदीपात्रातील दोन विहिरींजवळ पोकलॅन्ड मशीनने नदीपात्रातील पाणी विहिरीजवळ वळते केले. त्यामुळे तुमसरकरांना पाणीपुरवठा काही दिवस करण्यास मदत होईल. नदीचा प्रवाह पूर्ववत सुरु करण्याकरिता मध्यप्रदेशातील ढुड्डीघाट अथवा मांडवी बॅरेजमधुन पाणी सोडण्याची गरज आहे. सध्या सकाळी १७.५० लक्ष तर सायंकाळी १५ लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

तर भविष्यात २४ तास पाणीपुरवठा
तुमसर नगरपरिषदेने ५० कोटींची डीपीआर तयार केला आहे. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याकरिता नविन इंटकवेल, नवीन मोटार, नविन जलकुंभ, नविन जलवितरण नलिका अतिरिक्त पाच जलकुंभ तयार करण्याची योजना आहे. ही योजना इलेक्ट्रानिक राहणार असून आॅटोमेशन नगरपरिषद कार्यालयात त्याची माहिती प्राप्त होणार आहे. २४ तास सात दिवस पाणीपुरवठ्यासाठी आता डीपीआर तयार करा, अशा सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांना भेटी दरम्यान केली. यात १५ टक्के रक्कम नफा फंडातून भरावी लागणार आहे. दीड वर्षाची वेळ येथे डीपीआर ने मागितली आहे.
मुख्य जलवितरीका लिकेजचा टेंडर काढला आहे. कोष्टी घाटपंपगृह नादुरुस्त आहे. त्याचे कामाचे टेंडर निघणार आहे. जलशुध्दीकरण केंद्र अत्याधूनिक करण्याकरिता २० लक्ष खर्च अपेक्षीत आहे.
तुमसर नगरपरिषदेवर सिंचन विभागाचे २४ लक्ष रुपये थकीत आहे. दर महिन्याला ४० हजार रुपये सिंचन विभागाला द्यावे लागतात. ते नियमित न दिल्याने २४ लक्ष सध्या थकीत आहेत. व्याजाचा भूर्दंड येथे बसत आहे. शहरातील नविन वस्तीत विनोबा व श्रीराम नगरातील परिसरात आजही पाच ते सहा हजार नागरिकांना पाणीपूरवठा होत नाही.

तुमसरकरांना नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता नगरपरिषदेचे प्रयत्न सुरु आहे. इंटकवेल तयार करण्यात आले. जिल्हा प्रशासनालाही पाणी समस्या कळविली आहे. भविष्यात पाणीपुरवठा सक्षम करण्यात येईल.
चंद्रशेखर गुल्हाणे,
मुख्याधिकारी न.प. तुमसर
शहरवासींयांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन आ. चरण वाघमारे यांच्या मदतीने बॅरेज व ढुड्डीघाटातून पाणी सोडण्याकरीता मागणी करणार आहे.
मेहताबसिंग ठाकुर,
सभापती पाणीपुरवठा न.प. तुमसर

Web Title: Pokland intends to navigate in the river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.