पोलिसांचे आरोपीला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:34 PM2017-11-22T23:34:35+5:302017-11-22T23:35:02+5:30

पवनी तालुक्यातील निघवी येथे राजकारणाच्या वैमन्यश्यातून एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Police accused Abhay | पोलिसांचे आरोपीला अभय

पोलिसांचे आरोपीला अभय

Next
ठळक मुद्देनिघवी येथील घटना : ४८ तासानंतरही गुन्ह्यातील साहित्य जप्त नाही

आॅनलाईन लोकमत
भंडारा : पवनी तालुक्यातील निघवी येथे राजकारणाच्या वैमन्यश्यातून एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणात युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान ४८ तासानंतरही पवनी पोलिसांनी याप्रकरणातील साहित्य जप्त केले नाही. सोबतच महिलेला मारहाण व विनयभंग केलेली असतानाही केवळ आरोपींना वाचविण्याकरिता पोलिसांनी आवश्यक असलेली कलम दाखल केली नसल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र ब्राम्हणकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचा पराभव झाला. गावात मंडईनिमित्त दंडारीचा कार्यक्रम असल्याने घटनेच्या दिवशी महेश हा गावातील एका पानटपरीवर बसला होता. यावेळी निवडणुकीच्या कारणावरून ब्राम्हणकर यांनी महेश फुंडे याच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर ब्राम्हणकर याने महेशला पानठेल्यावरील खर्रा घोटण्याचा लाकडी पाटीने बेदम मारहाण केली. यात महेश गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला सोडविण्यासाठी महेशचा भाऊ बंबू फुंडे व त्याची आई शांताबाई हे धावून आले. यावेळी ब्राम्हणकर याने बंबू व त्याच्या आईला मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत आईच्या गळ्यातील मंगळसुत्र तुटले. या झटापटीत आईचा विनयभंग करण्यात आला. ग्रामस्थांच्या मध्यस्थीने भांडण सोडून जखमी महेशला पवनी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे दोन दिवस ठेवल्यानंतरही डॉक्टरांनी त्याच्यावर थातूरमातूर औषधोपचार केल्याने त्याची प्रकृती खालावली. यामुळे तेथील डॉक्टरांनी महेशला थेट नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र नागपूर येथे उपचारादरम्यान रुग्णाची सुविधा व खान्या-पिण्याची व्यवस्था होणार नसल्याने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले.
जखमी महेशवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान घटनेला ४८ तासांचा अवधी लोटला असूनही पवनी पोलिसांनी याप्रकरणात आवश्यक असलेले मारहाणीचे पुरावे व जखमी महेशचे रक्ताचे भरलेले कपडे अद्यापही जप्त केलेले नाही. सोबतच जखमीच्या आईचा विनयभंग झालेला असतानाही याप्रकरणात पवनी पोलिसांनी केवळ आरोपीला वाचविता यावा यासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: Police accused Abhay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.