‘त्या’ प्रकरणात पोलीस कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 10:08 PM2018-02-20T22:08:59+5:302018-02-20T22:10:07+5:30
शहरातील बावनकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्ता बंद केला होता. नियमाप्रमाणे पोलिसांनी प्रशासनाने संबंधितावर कारवाई केली नाही.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : शहरातील बावनकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्ता बंद केला होता. नियमाप्रमाणे पोलिसांनी प्रशासनाने संबंधितावर कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी करून पोलीस कारवाई न केल्यास शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तुमसर तालुका काँग्रेस कमिटीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
३१ जानेवारी रोजी तुमसर येथील बावनकर चौकात भाजप कार्यकत्यांनी विना परवानगीने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते. सुमारे दीड तास रस्त्यावर बसुन ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. उपचाराकरिता शहरात आलेल्या रूग्णांची प्रकृती खालावली होती. आंतरराज्य मार्ग असल्याने मोठा अनेकांना मनस्ताप सहन केला.
शासनाचा वेळ, पैसा व अधिकाऱ्यांची येथे उपस्थिती होती. नियमभंग करणाऱ्या विरोधात पोलीस प्रशासनाने अद्यापपावेतो कारवाई केली नाही. केवळ न्याय व सत्य कागदावरच राहील काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सात दिवसात कारवाई न केल्यास तालुका काँग्रेस कमेटी प्रशासनाला कोणतीच माहिती न देता शहरात जनआक्रोश मोर्चा काढेल असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राऊत, जी.प. सदस्य के. के. पंचबुध्दे, छबीलाल नागपुरे, सहादेव तुरकर, शिव बोरकर, कमलाकर निखाडे, गौरीशंकर पंचबुध्दे, स्नेहल रोडगे, समीर कुरैशी, विनोद राहुलकर, रामा मेश्राम, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे, शैलेश पडोळे यांचा समावेश होता.